अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यात मुकेश- नीता अंबानी यांचा रोमँटिक डान्स

अनंत- राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना(romantic) सुरूवात झालेली आहे. अनंत-राधिका यांचा संगीत सोहळा मुंबईतील बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याशिवाय काही क्रिकेटर्सलाही संगीत सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.

सध्या या इव्हेंटमधील(romantic) अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संगीत सोहळ्यामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला तो अंबानी कुटुंबीयांचा डान्स. त्यासोबतच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचाही एक डान्स परफॉर्मन्स. सध्या सोशल मीडियावर मुकेश आणि नीता यांचा रेट्रो डान्स तुफान व्हायरल होत आहे.

विरल भयानी या पापाराझी इन्स्टा चॅनलवर मुकेश आणि नीता यांचा रेट्रो डान्स शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबत आकाश- श्लोकाची मुलं पृथ्वी आणि वेदा, ईशा- आनंद यांची मुलं आद्या व क्रिष्णा सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे सर्वजण एका कारमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. या सर्वांनी १९६८ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रम्हचारी’ चित्रपटातल्या ‘चक्के में चक्का, चक्के पे गाडी’ गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. ५६ वर्षे जुन्या गाण्यावर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा अंबानी कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे. अनेकदा त्यांचं चाहते कौतुक करतात. याशिवाय अंबानी कुटुंबीयांनी ‘ओम शांती ओम’ या गाण्यावरही डान्स केलेला आहे. राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील अनेक व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत- राधिका विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटीसोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. या भव्य लग्नाचे कार्ड आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. १२ जुलैला भव्य दिव्य लग्न, १३ जुलैला शुभ आशीर्वाद सोहळा तर १४ जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजना, ॲपमध्ये कोणकोणती माहिती भरायची? सोप्या टिप्स फॉलो करा

पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! राहुल गांधी-शरद पवारांना… 

महाराष्ट्रात खळबळ! पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत