वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा(political news) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, वरळीतील हिट अँड रन प्रकरण घडलं त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी पोलिसांनी हिट अॅड रन केसमध्ये एक पांढऱ्या रंगाची BMW गाडी ताब्यात घेतली आहे(political news). ज्यावर एका पक्षाचं चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी गाडीसोबतच संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली.
मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं.
हेही वाचा :
नोकियाची धमाकेदार एन्ट्री! कीपॅडचा जबरदस्त 5G स्मार्टफोन लाँच केला
‘चेहऱ्यावर निशाण नाही, डोळ्यात मात्र आशा’; पहिल्या किमोथेरेपीनंतर Hina Khan ची पोस्ट
…म्हणून मुश्रीफांसमोर भर बैठकीत धनंजय महाडिक, प्रकाश आवाडेंनी व्यक्त केला संताप!