शिवसागर: आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत ६ जुलै रोजी ११ वीच्या विद्यार्थ्याने(classroom) विज्ञान शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या केली. मृत शिक्षकाचं नाव राजेश बाबू बिजवाडा असून ते संस्थेचे व्यवस्थापक होते.
शिक्षकाची हत्या करणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याला(classroom) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासावरून फटकारण्यात आलं होतं. पालकांना शाळेत घेवून येण्यास सांगितलं होतं. याचाच राग मनात धरून या विद्यार्थ्याने शिक्षकावर प्राणघातक हल्ला केला.
हा विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळेत आला होता. शिक्षकांनी त्याला परत जाण्यास सांगितलं, तेव्हा अचानक त्याने बिजवाडा यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजेश बाबू बिजवाडा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
विद्यार्थी चाकू घेवून शाळेत आला होता, याची कल्पना नसल्याची माहिती इतर शिक्षकांनी दिली आहे. गुन्हा केल्यानंतर विद्यार्थी शाळेतच होता. मृत राजेश बाबू यांची पत्नीही त्याच शाळेत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन शिवसागर सदर पोलीस ठाण्यात नेलं आहे.
हेही वाचा :
गुन्ह्यातील संशयित आरोपींची तुरुंगातील गर्दी कमी होणार?
वरळी हिट अँड रन प्रकरण; ती भरधाव कार शिंदे गटातील बड्या नेत्याची
“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, जी…” नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा