पुण्यातील डॅशिंग नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी वंचित बहूजन आघाडीला सोडचिठ्ठी(responsibility) देत अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत थाटात प्रवेश केला आहे. आज लाखो समर्थकांसह मातोश्रीवर येत वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशासह ठाकरेंनी पुण्यातील गड मजबूत केला आहे. यावेळी वसंत मोरे यांना ठाकरेंनी महत्वाची जबाबदारीही सोपवली.
वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर जात ठाकरे गटामध्ये(responsibility) प्रवेश केला. यावेळी काही नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आपण स्वगृही परतत असल्याच्या भावना वसंत मोरेंनी व्यक्त केल्या. त्यांनी १२ मार्च रोजी मनसेला रामराम ठोकला होता.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो.. याचा अनुभव घेऊन तुम्ही परिपक्व होऊन आलात. त्यामुळे मी तुम्हाला एक शिक्षा सुनावतो. असं म्हणत उपस्थितांना उद्देशून शिक्षा द्यायची का? असं विचारलं.
त्यावर सर्वांनी ‘हो’ म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या सगळ्यांनी ही शिक्षा देतो की तुम्ही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी शिवसेना वाढीसाठी काम केलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. तसंच काम करुन दाखवा, मी पुण्यात मोठा मेळावा घेतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसेमध्ये अंतर्गत कलहामुळे वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. हा निर्णय त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी घेतला होता. त्यांना लोकसभेसाठी वंचित आघाडीने तिकीट दिलं. परंतु त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी वंचित आघाडीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवार, दि. ९ जुलै रोजी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी शिवसेनेसोबत काम केलेलं आहे. परंतु राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊत ते राज यांच्यासोबत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही परतले आहेत.
हेही वाचा :
भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला
विराट कोहलीच्या ‘One8 Commune पब’विरोधात FIR दाखल
धक्कादायक घटना! हात अन् पाय पकडून महिलेला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल