पावसाळयाच्या दिवसांत थंड वातावरणात नेहमीच प्रत्येकाला काही तरी चटपटीत(snacks) खावेसे वाटत असते. अनेकदा संध्याकाळी हलकी हलकी भूक लागत असते अशावेळी काय खावे असा प्रश्न पडतो. मग अनेक तळलेलं पदार्थ समोर येत असतात. कांदा भजी, भजी अनेक प्रकार, समोसे, फ्रेंच फ्राईज. पण सुरु असलेलं डाएट आणि वाढते वजन पाहात मनात इच्छा असूनदेखील आपण हे असे तळलेलं पदार्थ खाण्यास टाळतो.
पण टेन्शन घेऊ नका. भारतीय खाद्यसंस्कृतीत(snacks) असे अनेक पदार्थ जे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. आणि आज आम्ही त्याच पदार्थांची यादी देणार आहोत जे तेलविरहित आणि स्वादिष्टदेखील आहेत.
खांडवी (सुरळीची वडी)
बेसन आणि दही किंवा ताकापासून बनवलेला हा गुजराती पदार्थ तुम्ही पावसाळ्यात ट्राय करु शकता. याला तेलाची अधिक आवश्यकता नसते. केवळ ग्रीसिंगसाठी आणि फोडणीसाठी तेल वापरावे लागते.
ढोकळा
रवा, बेसन, दही हिरव्या मिरचीची पेस्ट आणि पाणी एकत्र करुन पीठ तयार करा. त्यानंतर हे बॅटर तुम्ही कुकरमध्ये वाफवून घ्या. तुमचा ढोकळा तयार.
पापड चाट
पापड चाट बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला दोन पापड घेऊन दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे लागतील. आता त्यात टोमॅटो, कांदा, काकडी, लिंबाचा रस, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि टोमॅटो सॉस घाला. एकतर हे सर्व बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या, मिक्स करा आणि पापडांवर घाला आणि शेवटी टोमॅटो सॉस घाला आणि सर्व्ह करा.
स्टीम मोमोज
स्टीम मोमोजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. जसे कोबी, गाजर, लसूण, कांदा, हवे असल्यास त्यात चीजही घालू शकता. पीठ मळताना त्यात थोडे मीठ टाका, चव वाढेल. आता तुम्ही मेयोनेझ आणि रेड चिली सॉस बरोबर सर्व्ह करू शकता.
पोहे
ऑईल फ्री पोहे बनवण्यासाठी प्रथम पोहे भिजवून चांगले धुवावेत. आता त्यात हळद, मीठ, थोडी साखर, लिंबाचा रस आणि तिखट घालून मिक्स करा. आता स्टीमरमध्ये ५ मिनिटे गरम करा. स्टीमर प्रीहिटेड असल्याची खात्री करा.
हेही वाचा :
25 जून हा ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित, मोदी सरकारचा मोठा निर्णय
‘कल्की 2898 एडी’च्या दुसऱ्या भागातून दीपिकाचा पत्ता कट
सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण