विशाळगड येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटने प्रकरणी इंडिया आघाडीची बैठक न्यू राजवाडा(transfer) येथे पार पडली. खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विशाळगड येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना झालेल्या हिंसाचाराची(transfer) निष्पक्ष चौकशी करावी तसेच ही घटना टाळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची तत्काळ बदली केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. संभाजीराजे छत्रपती यांनी टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हते. शिवाय कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात जाती वादाला थारा नाही. यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.
आज इंडिया आघाडीचे प्रमुख नेते घटनास्थळी भेट देणार आहेत. परिस्थितीची माहिती घेऊन नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूरचे वातावरण कोणीतरी बिघडवत आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान आज सकाळी, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी विशाळगडाकडे रवाना झाले. यावेळी बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण हे निपक्ष काढण्यात यावे. शिवाय जे कुटुंब या हिंसाचाराला बळी पडले त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शाहू छत्रपती यांनी केले.
हेही वाचा :
वॉचमन चा मुलगा झाला चार्टर्ड अकाउंटंट (सीए)
शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना, सतेज पाटीलही सोबतीला; 19 जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा
देशातील तरुणांसाठी खुशखबर! बेरोजगारीच्या संकटात टाटांनी दाखवलं मोठं मन