पार्किंगवरून वाद; रिक्षाचालकाने पोटात हत्यार खुपसले अन्…

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रहिवाशी इमारतीच्या पार्किंगसमोर (parking) लावलेला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून वादविवाद झाल्यानंतर रिक्षा चालकाने तरुणाच्या पोटात तीक्ष्ण हत्यार घुपसून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मानेवर व हातावर देखील वार केल्याने तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात रिक्षाचालक सोमनाथ हनुमंत पवार (वय ३३, रा. शिवणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संदीप देसाई (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे. या हल्यात संदीप गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप व सोमनाथ हे एकाच परिसरात राहण्यास असून, त्यांच्या इमारतीही शेजारी आहेत. सोमनाथ रिक्षा चालवितो. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडे आकराच्या सुमारास संदीप व त्याचे दोन मित्र घरी आले होते. तेव्हा त्यांना इमारतीच्या पार्किंगसमोर(parking) रिक्षा पार्क केल्याचे दिसले. त्यांनी सोमनाथला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्यात वादविवाद झाले.

नंतर सोमनाथ याने तीक्ष्ण हत्यार काढून संदिप याच्यावर हल्ला केला. सपासप वार केल्यानंतर त्याने संदिपच्या पोटात हत्यार घुपसून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. यामध्ये संदिप गंभीररित्या जखमी झाला आहे. अधिक तपास अतुल क्षिरसागर हे करत आहेत.

हेही वाचा :

इस्रायल/इराण युद्धात, आता अमेरिका उतरली

Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?

विजय देवरकोंडाच्या अडचणीत वाढ, SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?