मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर राजकीय वर्तुळात शोककळा

राज्यमंत्री दर्जाचे आणि मच्छीमार कल्याण मंडळाचे अध्यक्ष भरत माटियारा यांचे हैद्राबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते मागच्या काही दिवसांपासून एका दुर्धर आजाराने ग्रस्त होते, चांगल्या उपचारांसाठी त्यांना रायपूरहून हैदराबादला हलविण्यात आले होते. (BJP) मात्र त्यांची या आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच भाजपमध्ये शोककळा पसरली असून पक्षातील नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

२९ व्या वर्षी थेट मंत्री! थलापती विजय यांचा मोठा निर्णय; एस. किर्तना यांच्या नावाची चर्चा मिळालेल्या माहितीनुसार, भरत माटियारा मागच्या एक महिन्यांपासून आजारी होते, त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना चांगल्या उपचारासाठी हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भरत माटियारा हे दोनवेळा भाजप जिल्हाध्यक्ष होते. (BJP) त्यानंतर त्यांची मच्छीमार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात आली. राज्यातील तळागळात पोहोचलेले कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी एक्सवर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अंतिम संस्कार आणि अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जात आहे. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार केला जाईल.

राज्यमंत्री आणि मच्छीमार कल्याण मंडळाचे अध्यक्ष भरत मटियारा हे छत्तीसगड भाजप संघटनेतील एक सक्रिय आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते . ते बऱ्याच काळापासून संघटनात्मक कार्यात सहभागी होते आणि (BJP) त्यांनी दोनदा कांकेर भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. मच्छीमार समाजात आणि ग्रामीण भागांमध्ये त्यांचा मजबूत प्रभाव असल्याचे मानले जात होते, जिथे ते संघटना मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी सतत सक्रिय होते. पक्ष पातळीवर, प्रादेशिक स्तरावर संघटनेचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख होती.

हेही वाचा

जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात

ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?