क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोमवारी 23 जून रोजी रात्री भारतीय क्रिकेटसाठी(Cricket) एक अतिशय दुःखद बातमी आली. भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. २३ जून रोजी दिलीप दोशी यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दिलीप दोशी यांनी अलीकडेच भारत आणि इंग्लंडमधील सुरू असलेल्या मालिकेबद्दल बोलले होते. स्टार फिरकी गोलंदाज दोशी यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३३ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले.

स्टार फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये(Cricket) पदार्पण केले. ते १९७९ मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाकडून खेळले. त्यांची क्रिकेट कारकीर्द १९८३ मध्ये संपली. या काळात त्यांनी ३३ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी ६ वेळा ५ बळी घेत एकूण ११४ बळी घेतले. याशिवाय, १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३.९६ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने २२ बळी घेतले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोशी सौराष्ट्र आणि बंगालकडूनही खेळले. काउंटी क्रिकेटमध्ये ते बर्कशायर आणि नॉटिंगहॅमशायर संघांचाही भाग होते. दिलीप दोशी यांचे आत्मचरित्र खूप लोकप्रिय आहे. त्याचे नाव स्पिन पंच आहे. क्रिकेटपटू असण्यासोबतच दिलीप दोशी हे एक यशस्वी समालोचकही होते. सोशल मि़डीयावर बीसीसीआयने यासंदर्भात माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, ‘माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांच्या दुःखद निधनाबद्दल बीसीसीआय शोक व्यक्त करते. त्यांचे लंडनमध्ये दुर्दैवाने निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’.

निवृत्तीनंतर त्यांनी समालोचनाच्या जगात खूप नाव कमावले. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी कालिंदी, एक मुलगा नयन आणि मुलगी विशाखा यांचा समावेश आहे. दिलीप दोशी यांचा मुलगा नयन याने सौराष्ट्रासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळले आहे. याशिवाय, तो काउंटीमध्ये सरे संघाकडूनही खेळला आहे. दिलीप दोशी हे बऱ्याच काळापासून लंडनमध्ये राहत होते. बीसीसीआय व्यतिरिक्त रवी शास्त्री आणि हरभजन सिंग यांनीही दिलीप दोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! 1 जुलैपासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही

विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्रमावर संशय; डिजिटल मीडियाचा बहिष्कार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; NPS आणि UPS योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ