आज शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Banners) यांचा ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील मातोश्री निवास्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. बॅनर्सवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, तामिळनाडू शिवसेना UBT पक्षाने देखील वाढदिवसाच्या बॅनर्स लावले आहेत.
शिव सहकार सेनेकडून खास वाढदिवसाच्या(Banners) निमित्ताने एक विशेष केक तयार करण्यात आला आहे. या केकवर “साहेब, परत मुख्यमंत्री बनवायचं, महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा ध्यास आहे” असा मजकूर लिहण्यात आलेला आहे. हा केक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. कोरोना काळातही त्यांनी महाराष्ट्राची चांगली देखभाल केली, ज्यामुळे ते कमी कालावधीतच लोकप्रिय मुख्यमंत्री बनले.
मात्र, शिवसेनेत फूट पडल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महायुतीची सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी चंग बांधला आहे.
लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिक नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. सांगली शहरातही उद्धव ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण शहरभरात बॅनरबाजी केली असून, या बॅनर्सची संपूर्ण शहरभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :
आठवडाभरात सोने 5, तर चांदीत ११ हजार रुपयांची घसरण
कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर, लष्कराची तुकडी सांगलीत दाखल
धर्मवीर-2 चित्रपटाची रिलीज तारीख बदलली: निर्मात्यांची प्रतिक्रिया