ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. आता सर्वांनाच ऑगस्ट महिन्यात करावयाच्या कामांचा(Bank) वेध लागला आहे. ऑगस्ट महिन्यात कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, याची अनेकजण यादी करत आहेत. बँक ही जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची आस्थापना आहे. बँकेशिवाय सध्या कोणतेही आर्थिक व्यवहार होत नाहीत. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील कामांच्या यादीत तुमचे बँकेचेही काम असू शकते. मात्र बँकेच्या कामाचे नियोजन करण्याआधी ऑगस्ट महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.

ऑगस्ट महिन्यात एकूण 14 सुट्ट्या आहेत. त्यामुळे या सुट्ट्यांचा अंदाज घेऊनच तुम्ही तुमचे बँकेच्या(Bank) कामाचे नियोजन करायला हवे. आरबीआयकडून प्रत्येक महिन्याला सुट्ट्यांची लिस्ट प्रसिद्ध खेली जाते. सुट्ट्यांची ही यादी संकेतस्थळावर पाहता येते. याच यादीनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 14 दिवस सुट्ट्या आहेत. म्हणजेच ऑगस्टमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद असतील.

आगामी ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी हे मोठे सण असणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन आहे. या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे बँकेचे काम ठरवायला हवे. रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि भारतीय स्वातंत्र्यदिनी संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल. यासह ऑगस्ट महिन्यात एकूण चार रविवार आणि दोन शनिवार आहेत. या दिवशीही संपूर्ण देशातील बँका बंद अशतील. यासह वेगवेगळ्या राज्यांत स्थानिक सणांनुसार बँका बंद असतील.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी
3 ऑगस्ट- केर पूजा (Ker Puja) – अगरतळामध्ये बँकांना सुट्टी असेल
4 ऑगस्ट- रविवार – पूर्ण देशात बँकांना सुट्टी
7 ऑगस्ट- हरियाली तीज – हरियाणामध्ये बँकांना सुट्टी असेल
8 ऑगस्ट- तेंदोंग लो रम फॅट (Tendong Lho Rum Faat) – गंगटोकमध्ये बँकांना सुट्टी असेल
10 ऑगस्ट- दुसरा शनिवार – संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
11 ऑगस्ट- रविवार – संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
13 ऑगस्ट- पेट्रियॉट डे (Patriot Day) – इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल
15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिन – संपूर्ण बँकांना सुट्टी असेल
18 ऑगस्ट- रविवार – संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
19 ऑगस्ट- रक्षाबंधन – अहमदाबाद, जयपूर, कानपूर, लखनौ यासह देशातील अनेक ठिकाण बँकांना सुट्टी असेल
20 ऑगस्ट- श्री नारायण गुरु जयंती – कोची आणि तिरुअनंतपूरम या भागात बँकांना सुट्टी असेल
24 ऑगस्ट- चौथा शनिवार – संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
25 ऑगस्ट- रविवार – संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल
26 ऑगस्ट- जन्माष्टमी – पूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल

हेही वाचा :

आठवडाभरात सोने 5, तर चांदीत ११ हजार रुपयांची घसरण

धर्मवीर-2 चित्रपटाची रिलीज तारीख बदलली: निर्मात्यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर पालिकेने जारी केले हेल्पलाइन क्रमांक: पूरपरिस्थितीत त्वरित मदतीसाठी संपर्क साधा