पुण्यातील मुंढवा येथील कोरेगाव पार्क परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये लैंगिक अत्याचाराची ही घटना समोर आली आहे. (Pune) याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री पार्टीत ओळख झालेल्या एका इसमाने घरी सोडतो म्हणून कारमध्ये नेलं आणि अत्याचार केला. पुण्यातल्या प्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमधून महिला आणि पुरुष बाहेर पडले होते. या महिलेची आणि पुरुषाची ओळख पार्टीमध्ये झाली होती, (Pune) त्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने या नराधमाने पीडित महिलेवर धावत्य कारमध्ये अत्याचार केला आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनं पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच कोरेगाव पार्कमध्ये घडलेल्या या महिलेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. तर गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
पुण्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक पोलीस प्रशासनाला आणि सरकारला विचारत आहे. चिमुकल्या मुली असो किंवा विवाहित महिला असो, (Pune) यांना घराच्या बाहेर पडणं देखील मुश्कील झालं आहे. म्हणजे, नसरापूर प्रकरणाला महिनाही उलटला नाही तोवर ही अत्यंच संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनांना कधी आळा बसेल? पोलिसांचा धाक आता गुन्हेगारीत क्षेत्रात उरलेला नाहीय का? सर्वसामान्यांसोबत जे काही घडतंय, त्याला कोण न्याय देणार? असा प्रश्न आता जनसामान्यातून पुढे येत आहे.
हेही वाचा
जलतरण तलावात बुडून परप्रांतीय तरुणाचा मृत्यू
भिलवडीत पाच हजाराची लाच घेताना हवालदार जाळ्यात
ग्राहकांना अजून मोठा झटका गॅस सिलेंडरचा बदलला हा नियम, जून महिन्यात बंद होणार तुमचे कनेक्शन?