‘दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार’; थेट पोलीस स्टेशनमध्ये…

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनचा मुलगा नाग चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता दुलीपाल(woman)या दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला. तेव्हापासूनच हे दोघेही चांगलेच चर्चेत आहे. या दोघांनाही आता एकमेकांच्या रुपात जोडीदार मिळणार असल्याने त्यांच्या कुटुंबियांबरोबरच चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मात्र असं असतानाच आता एका ज्योतिषाने हे दोघेही 2027 मध्ये विभक्त होतील असा दावा केला आहे. पण दाव्यामुळे हा ज्योतिषीच अडचणीत आला आहे.

ज्या ज्योतिषाने अभिनेत्री समथांचा पूर्वाश्रमीचा पती नाग चैतन्याचं दुसरं लग्नही(woman) पुढल्या तीन वर्षांमध्ये तुटेल असं भाकित केलं आहे त्यांचं नाव वेणू स्वामी असं आहे. वेणू यांनी ही भविष्यवाणी करण्यापेक्षा त्यांनी ज्या असंवेदनशीलपणे हे सारं मांडलं त्यावरुन त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. दोघांच्या संसाराबद्दल भाष्य करताना वेणू यांनी दोघांचा संसार पुढील काही वर्षच टीकेल असं म्हटलं आहे. नाग चैतन्य आणि शोभिता हे 2027 च्या आसपास विभक्त होतील असं म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोघे विभक्त होण्यासाठी एक महिलाच कारणीभूत असेल असंही वेणू यांनी म्हटलं आहे. पण या दाव्यामुळे आता वेणूच अडचणीत सापडलेत.

वेणू स्वामी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतानाच या वादग्रस्त भाकितासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेलगू फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनने म्हणजेच टीएफजेए या संस्थेनं वेणू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

‘123 तेलगू’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शोभिता आणि नाग चैतन्यासंदर्भातील वेणू यांचं विधान आक्षेपार्ह असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. असं असतानाच वेणू यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या प्रकरणी स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपण केलेलं भाकित हे नाग चैतन्य आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समंथा रौत प्रभूमध्ये जे काही झालं ते पुन्हा घडू नये यासंदर्भातील इशारा म्हणून होतं, असं वेणू यांनी म्हटलं आहे. 8 ऑगस्ट रोजी नागार्जूनने मुलगा नाग चैतन्याच्या साखरपुड्याचा पहिला फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला होता.

तसेच वेणू यांनी यापुढे आपण सिनेकलाकारांबद्दलची कोणतीही भाकितं करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “मी यापुढे कधीही राजकारणी आणि सिनेकलारांबद्दल भाकित न करण्याची शपथ घेतली आहे. मी माझा शब्द पाळणार आहे. मी चित्रपट संस्थेच्या अध्यक्षांनाही असा शब्द दिला आहे,” असं वेणू म्हणाले.

हेही वाचा :

विजेचा शॉक देऊन सासरच्या मंडळींकडून जावयाची हत्या

केशवराव भोसले नाट्यगृह संशयाची आग धुमसतेय!

अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या बलात्कारानंतर प्रायवेट पार्टवर 50 वेळा चाकूने वार