‘मूड’ नेहमी खराब राहतो? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं आणि उपाय

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे चिडचिडेपणा,(depression)थकवा, नैराश्य आणि मूड स्विंग्स ही सामान्य पण गंभीर बनलेली समस्या आहे. बऱ्याच जणांना असे वाटते की मूड खराब होणे ही मानसिक कमजोरी आहे, मात्र प्रत्यक्षात यामागे काही ठोस वैज्ञानिक कारणं असतात. कामाचा ताण, आर्थिक अडचणी, नात्यांतील ताण-तणाव, ब्रेकअप, झोपेचा अभाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मेंदूतील काही हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे मूडमध्ये सतत बदल जाणवतो.

डॉक्टरांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे, (depression)त्यांच्या मते, जेव्हा आपल्याला चिडचिड, गोंधळ, तणाव किंवा गडबडीत विचार येतात, तेव्हा त्यामागे मेंदूतील रासायनिक घडामोडी जबाबदार असतात.

मूड खराब होण्याची प्रमुख वैज्ञानिक कारणं

  1. सेरोटोनिन आणि डोपामिनचं असंतुलन : हे दोन्ही हार्मोन्स “फील-गुड” म्हणून ओळखले जातात. झोप कमी होणे, सततचा तणाव किंवा चुकीचा आहार यामुळे या हार्मोन्सचं प्रमाण घटतं, आणि त्यामुळे मूड खालावतो.
  2. झोपेचा अभाव : मेंदूला विश्रांती मिळाली नाही, तर तो सतत तणावाखाली असतो. परिणामी चिडचिड, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो.
  3. हार्मोनल बदल : विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी, (depression)गर्भधारणा किंवा मेनोपॉजच्या काळात हार्मोनल असंतुलन होतं आणि त्यामुळे मूड मध्ये सतत चढ-उतार होत राहतो.
  4. असंतुलित आहार : प्रोसेस्ड फूड्स, जास्त साखर किंवा कॅफीनयुक्त पदार्थ घेतल्याने रक्तातील साखरेचा स्तर वेगाने कमी-जास्त होतो. याचा थेट परिणाम मानसिक संतुलनावर होतो.
  5. व्हिटॅमिन डीची कमतरता : सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास सेरोटोनिन तयार होण्यात अडथळा येतो. परिणामी नैराश्यासारख्या भावना येतात आणि मूड कायमच खालावलेला राहतो.
  6. मानसिक तणाव आणि चिंता : सततचा तणाव घेतल्यास शरीरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो, जो मेंदूला थकवतो आणि भावनिक अस्थिरता निर्माण करतो.

मूड कसा सुधारावा?

सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा, यामुळे नैसर्गिकरित्या हार्मोन्सचं प्रमाण संतुलित राहतं.

योग, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करा, यामुळे मन शांत राहतं.

दररोज थोडा व्यायाम किंवा चालणं, यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

संतुलित आहार घ्या, विशेषतः फळं, भाज्या, नट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ.

विश्वासू मित्रांशी संवाद साधा, मन मोकळं केल्याने मानसिक भार कमी होतो.

आवडती संगीत ऐका किंवा हलकी मन हलकी करणारी कृती करा.

किमान 7-8 तासांची चांगली झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे.

हेही वाचा :

सिंधू पाणी करार : पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका!

राज-उद्धव एकत्र… शरद पवारांचा बिनशर्त पाठिंबा! 

बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन! रुग्णालयाबाहेरील Video समोर