‘या’ राशींवर शनीदेवाचा आशीर्वाद; नव्या नोकरीसह होणार धनलाभ

ज्योतिष्य(astrology) शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक वेगळं महत्त्व आहे. यामध्ये शनी देवाला विशेष महत्त्व देण्यात येतं. शनी देव हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्ष लागतात. असं मानलं जातं, शनीच्या स्थिती बदलाचा प्रत्येक राशीवर परिणाम होतो. असंच शनीमुळे एक खास राजयोग तयार झाला आहे.

शनी सध्या मूळ त्रिकोण राशीत(astrology) कुंभ राशीत असून पुढच्या वर्षापर्यंत तो याचठिकाणी राहणार आहे. शनि मूळ त्रिकोणी राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार झाला आहे. शश राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास
30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनीमुळे शश राजयोग निर्माण झाला आहे. या काळात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. भागीदारीमध्ये व्यवसाय केल्यास फायदा होऊ शकतो. नोकरदारांना चांगल्या वेतनवाढीसह पदोन्नती मिळू शकणार आहे.

कन्या रास
शनि गोचर आणि शश राजयोगामुळे लोकांना भरपूर यश मिळू शकणार आहे. पदोन्नतीसह काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होणार आहेत. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. नशीब तुमची साथ देणार आहे.

वृश्चिक रास
शनि मूळ त्रिकोण राशीत असणार आहे. यामुळे शश राजयोग तयार होणार असून तुमच्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. कामानिमित्त प्रवास करण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटमधून तुम्हाला लाभ मिळू शकतो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

हेही वाचा:

‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेत झाला ‘हा’ मोठा बदल; आता…

शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार

पत्नीशी भांडून पतीनं नदीत मारली उडी, ८ तासांच्या संघर्षानंतर बचावकार्यात यश