दुपारी भरपेट जेवणाचा आनंद घेऊन अनेकजण ताणून झोप काढतो. आपल्यापैकी काहीजण रोज दुपारी वामकुक्षी घेतात. पण आता तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. दिवसा झोपल्याने तुमच्या आरोग्याला मोठी हानी पोहोचू शकते. काय होऊ शकतं दुपारी झोपल्याने(sleeping).

अनेकदा आपण दुपारी किंवा दिवसा झोप(sleeping) काढतो. जरा आराम मिळावा, थकवा दूर व्हावा यासाठी ताणून झोपतो. पण अशी दिवसा झोप घेणं तुमचं आरोग्य बिघडवू शकतं. याबाबत केलेल्या एका संशोधनातून झोप उडवणारी माहिती समोर आलीये. दिवसा झोपेबाबत आंतरराष्ट्रीय परिषदेत एक अहवाल सादर करण्यात आला.
या अहवालात काही धक्कादायक दावे करण्यात आलेत. यानुसार जे दिवसा झोपतात. त्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता वाढते. याबाबत सांख्यिकी माहीतीही समोर आलीये. दिवसा झोप न घेणाऱ्यांच्या तुलनेत. दिवसा झोपणाऱ्यांच्या अकाली मृत्यूची शक्यता 20 टक्के जास्त असते.
खरंतर भारतात दुपारी जेवणानंतर झोपणं, वामकुक्षी घेणं, सामान्य आहे. सहसा लोक जेवणानंतर 20 ते 30 मिनिटे झोप घेतात. पण या अहवालानुसार दिवसा झोपणे, हे प्रत्यक्षात आरोग्याशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. दिवसा झोपल्याने, हृदयाच्या ठोक्यांच्या नैसर्गिक गतीवर परिणाम होऊ शकतो. दिवसा जास्त झोपल्याने मेंदूच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. दिवसाची झोप अल्झायमर सारख्या आजाराचे कारण बनू शकते.

हल्ली सोशल मीडिया किंवा कामाच्या वेगवेगळ्या वेळांमुळे दिवसा झोपण्याचं प्रमाण वाढतंय. रात्रीच्या झोपेची गरज दिवसाच्या झोपेतून भरून काढली जाते. पण ही झोप (sleeping)आता तुमच्या जीवाशी येऊ शकते. आपल्या झोपेच्या चक्रात मेलाटोनिन हे घटक महत्वाच असतं.
- मेलाटोनिन हे शरीरात नैसर्गिकरित्या आढळणारे हार्मोन आहे
- हा एक ‘झोप-प्रेरित करणारा हार्मोन’ आहे, जो झोपेत महत्त्वाची भूमिका बजावतो
- मेलाटोनिन हा मेंदूतील पाइनल ग्रंथीचा स्राव आहे
- रात्रीच्या अंधारात, वेगाने मेलेटोनिन तयार होते, तेव्हा गाढ झोप यायला सुरूवात होते
- जे लोक दिवसा झोपतात, त्यांची या हार्मोनच्या निर्मितीची प्रक्रिया मंदावते
- त्यामुळे अशा लोकांना रात्री झोप लागणं अडचणीचं होतं
दिवसा, दुपारी झोपेबाबत आता एक नवा अहवाल समोर आलाय. त्या अहवालानुसार मेंदुसंबंधित आजारासोबत इतरही आजारांना निमंत्रण मिळंतय.
- दिवसा झोपल्याने मेंदुसंबंधी आजार येऊ शकतं
- नैराश्य, चिंता, गोंधळ, स्मरणशक्ती कमी होणे, काहीही समजण्यात अडचण, तणाव
- चिडचिडेपणा आणि वागण्यात बदल होण्याची शक्यता
- शरीर थकलेले, सुस्त, आणि उत्साहाचा अभाव
- दिवसा जास्त वेळ झोपल्याने रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो
- डोळ्यांचे आजार होऊ शकतात, दृष्टी कमकुवत होऊ शकते.
या लोकांनी दुपारी झोपू नये!
-हाय कोलेस्ट्रॉलचे रुग्ण
-लठ्ठ असलेले लोक
-भरपूर फॅटयुक्त पदार्थ किंवा आहार खाल्ल्यावर
-कफ प्रकृतीचे लोक
आपल्या आरोग्यदायी आयुष्यासाठी झोप महत्वाची असते. पण दिवसा जास्त वेळ झोपल्याने मेंदुच्या गुंतागुंतीच्या आजारासोबत इतर आजारही उद्भवू शकतात. थकवा घालवण्यासाठी 15-20 मिनिटे झोप ठिक,,,पण तासन तास झोपणं तुमचं आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे दिवसा झोपणं आताच बंद करा आणि आजारांपासून दूर राहा.
हेही वाचा :
मोठी बातमी! १ जुलैपासून वाहनांच्या किंमती वाढणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
कोल्हापूरच्या हुकमी एक्क्याने ठाकरेंची साथ सोडली, पश्चिम महाराष्ट्राचे राजकारण बदलणार
जीममध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवताय? ‘या’ टिप्स लक्षात ठेवल्यास फीटनेसची सुरुवात होईल परफेक्ट