आईवरून शिवीगाळ केली, छतावर लटकलेल्या अवस्थेत सापडलं बॉसचं मुंडकं!

ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या छतावर सापडलेल्या मुंडक छाटलेल्या मृतदेह(dead body) प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या घटनेने ठाणे शहर हादरले असताना, पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपीला अटक केली आहे. कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या हत्येचा मुख्य आरोपी प्रसाद कदम, जो या सोसायटीचा लिफ्टमन आहे, त्याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्याची(dead body) पार्श्वभूमी अशी आहे की, ३५ वर्षीय सोमनाथ सातगिरी हे सोसायटीचे सुपरवायझर होते आणि आरोपी प्रसाद कदम त्याच्या हाताखाली काम करत होता. सोमनाथ सातगिरी यांनी प्रसाद कदम याला आईवरून शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात प्रसादने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे. शिवाय, सोमनाथ यांच्याकडून उधार घेतलेल्या ८,००० रुपयांवरूनही वाद उभा राहिला होता.

प्रसादने गुन्हा करण्यापूर्वी सोशल मीडियावर अनेक क्राईम वेब सिरीज पाहून हत्येची तयारी केली. सोमनाथला टेरेसवर नेऊन त्याच्यावर अनेक वार करून त्याची हत्या केली आणि त्याचे मुंडके छाटून घटनास्थळावरून पसार झाला.

ठाणे क्राइम ब्रांच युनिट-५ च्या टीमने प्रसाद कदमला सांगलीतून अटक करून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येचे हत्यार अजूनही पोलिसांच्या हाती लागले नसून, ते शोधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा:

सळसळणारा उत्साह आणि रस्त्यावर उतरलेला जनसागर

सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; कांद्याचे दर वधारले, लसणाचीही तेजी कायम

आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर