आज 21 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी (ganesh chaturthi)तिथी आहे. चतुर्थी तिथी संध्याकाळी 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत राहील. तर रात्री 11 वाजेपर्यंत व्याघात योग जुळून येईल,त्यानंतर हर्ष योग सुरु होईल. तसेच चतुर्थी तिथी असलेल्यांचे श्राद्ध सुद्धा आज केले जाईल. याशिवाय आज संकष्टी चतुर्थी सुद्धा असणार आहे.
आजच्या दिवशी संकष्टीला गणेश(ganesh chaturthi) भक्त उपवास करतात. पूजापाठ करतात आणि नैवैद्य म्हणून मोदक सुद्धा अर्पण करतात. आज संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची कृपादृष्टी कुणावर असणार, ते पाहुयात.
मेष रास : आज संकष्टी चतुर्थीला मेष या राशीवर बाप्पाची कृपा राहील. आज तुमचे सगळे काम मार्गी लागतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा आज पूर्ण होतील. बाप्पाच्या कृपेने आज तुम्ही नव्या कामाला सुरुवात करू शकता.तुम्हाला यश नक्की मिळेल.
वृषभ रास : आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुमच्यावर बाप्पा प्रसन्न राहतील. तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी चालून येईल. तुमच्या कलेला आज व्यासपीठ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मिथुन रास : नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल. आज जोडीदारासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. आज जवळचा प्रवास योग आहे. आवडत्या व्यक्तीसोबत पिकनिकला जाल.
कर्क रास : डोंगराळ भागात फिरायला जायचा प्लॅन ठरेल. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. आज तुमच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न राहतील. आज धार्मिक कार्यात देखील सहभागी व्हाल. आज दिवसभर मन प्रसन्न राहील.
हेही वाचा:
शेतकऱ्यांना मिळणार 4194 कोटींचे अनुदान
Google देणार मोठा धक्का! बंद करणार लाखो Gmail अकाउंट
उपोषणाचा चौथा दिवस, आधाराशिवाय चालणं मुश्कील, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली