बॉलिवूड(Entertainment news) अभिनेत्री दिशा पटानीनं रुमर्ड बॉयफ्रेंड अॅलेक्झॅन्डर अॅलेक्स आणि हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टेनकोविक हे सतत चर्चेत असते. त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा या स्विमिंग पूलमधील व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अॅलेक्झॅन्डरनं त्यांच्या इन्स्टाग्राम(Entertainment news) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओशिवाय त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी देखील शेअर केल्या आहेत. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटोंमध्ये नताशानं मोनोकिनी परिधान केली आहे. तर त्याशिवाय ती स्विम रिंगवर बसली आहे. तिनं आणखी काही स्विम रिंगचे फोटो शेअर केले आहेत.
अॅलेक्झॅन्डरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओत नताशा पूलमध्ये डोळे बंद करून रिलॅक्स करत असताना अॅलेक्झॅन्डर हा मागून येतो आणि नताशाचा ट्यूब उलटा करत तिला पूलमध्ये पाडतो. तर नताशा कशी तरी त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नताशासोबत अॅलेक्झॅन्डरला मस्ती करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तो नताशासोबत सुट्टीचा आनंद घेत असल्याचे सगळ्यांना पाहायला मिळत आहे.
अॅलेक्झॅन्डरनं शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘हा दिशाचा बॉयफ्रेंड हार्दिकच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत मस्ती का करतोय?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘देख रहा है बिनोद?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘भारत सरकारनं या दोघांना व्हिजा द्यायला नको.’
आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘हार्दिक दुसऱ्या अकाऊंटवरून हे सगळं पाहत असेल.’ अनेकांनी प्रश्न केला आहे की हे दोघं नेहमीच सोबत कसे काय असतात. तर नताशानं अॅलेक्झॅन्डरनं शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत सेका असं म्हणतं हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेकोविकनं याचवर्षी जुलै महिन्यात एकत्र सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली.
हेही वाचा:
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात
प्रकाश आवाडे हेच लाचार; शशांक बावचकरांनी आवाडेंचा इतिहासच काढला
खळबळजनक ! महाविद्यालयाच्या आवारातच विद्यार्थ्याचा खून; कोयत्याने केले सपासप वार