‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझन प्रचंड गाजत आहे. कारण यंदाच्या वर्षी बिग बॉसचा(voot bigg boss) सिझन हा अवघ्या 70 दिवसांचं आहे. त्यामुळे आता ग्रँड फिनाले देखील अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यानंतर बिग बॉस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापूर्वीचे सीझनम हे 100 दिवसांचे असायचे. मात्र, या सीझनच्या बाबतीत ‘बिग बॉस’ने एक मोठा निर्णय घेत दहा आठवड्यांमध्ये हा सीझन संपेल अशी घोषणा घरात केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह नेटकऱ्यांमध्ये देखील नाराजीचं वातावरण पसरलं आहे.
अशातच आता ग्रँड फिनाले वीक सुरु झाला आहे. कालच्या भागात ‘तिकीट टू फिनाले’ हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरज चव्हाणला हरवत निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’ च तिकीट मिळवलं आहे. म्हणजेच यंदाच्या सीझनमध्ये ग्रँड फिनालेला जाणारी पहिली सदस्य निक्की तांबोळी ठरली आहे. बिग बॉसच्या(voot bigg boss) घरातून बाहेर पडलेला स्पर्धक अरबाजने दिलेल्या म्युचुअल फंड्सच्या कॉइन्समुळे निक्कीला ‘तिकीट टू फिनाले’ची थेट उमेदवारी मिळवता आली. यानंतर निक्की एका टास्कमध्ये सूरजचा पराभव करत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली आहे.
‘तिकीट टू फिनाले’च्या टास्कमध्ये बाजी मारल्याने या आठवड्यात मिडवीक एलिमिनेशन होणार आहे. मात्र यावेळी निक्की तांबोळी सुरक्षित असणार आहे. तिच्याशिवाय संपूर्ण घर आता नॉमिनेट झाले आहे. या स्पर्धेच्या अंतिम आठवड्यात घरातील वर्षा, धनंजय, अंकिता, अभिजीत, जान्हवी आणि सूरज हे सहा सदस्य नॉमिनेटेड झाले आहेत. त्यामुळे आता Mid-Week एलिमिनेशन लवकरच पार पडणार आहे.
त्यामुळे आता निक्की सोडून उर्वरित सहा सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. मात्र ग्रँड फिनाले आधी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये पहिल्यांदाच मिडवीक एलिमिनेशन पार पडणार आहे. अशातच आता प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की, Mid-Week एलिमिनेशनसाठी व्होटिंग लाइन्स कधी पर्यंत चालू राहणार आहेत.
यंदाच्या सीझनमधील Mid-Week एलिमिनेशनसाठी व्होटिंग लाइन्स 2 ऑक्टोबर रात्री 10.30 पर्यंत चालू राहणार आहेत. यानंतर घरातील उर्वरित सदस्यांमध्ये ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ‘आता बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा हा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा:
युद्ध भडकतय आखातात धग लागणार मात्र भारतात
भाजपला मोठा धक्का! फडणवीसांच्या जवळचा ‘हा’ नेता तुतारी हाती घेणार
प्रियांका चोप्रा नादियाच्या भूमिकेत परतणार, ‘सिटाडेल सीझन 2’ कधी रिलीज होणार