खुशखबर ! महिंद्रा थार रॉक्सची बुकिंग सुरु

प्रत्येक तरुण मुलाचं महिंद्रा कंपनीची थार गाडी घेण्याचं स्वप्न असतं. अशातच आता महिंद्रा कंपनीने महिंद्रा थार रॉक्स या गाडीची बुकिंग आजपासून म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून सुरु केली आहे. महिंद्रा थार रॉक्स ही या वर्षातील सर्वात मोठ्या लाँचपैकी(launch) एक आहे. यासंदर्भात कंपनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

महिंद्रा कंपनीने 15 ऑगस्ट रोजी महिंद्रा थार रॉक्स लाँच(launch) केली आहे. महिंद्रा थार रॉक्स पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पॉवरट्रेनमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये 2-लिटर mStallion Turbo पेट्रोल डायरेक्ट इंजेक्शन इंजिन आहे.

या इंजिनसह, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 119 kW ची शक्ती आणि 330 Nm टॉर्क उपलब्ध आहे. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही कार 130 kW ची पॉवर मिळवते आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. महिंद्रा थार रॉक्समध्ये डिझेल इंजिनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. महिंद्राच्या या वाहनात 2.2 लिटर mHawk डिझेल इंजिन आहे. ही कार RWD आणि 4*4 या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

या कारमध्ये बसवलेले डिझेल इंजिन 128.6 kW ची कमाल शक्ती प्रदान करते आणि 370 Nm टॉर्क जनरेट करते. महिंद्रा थार रॉक्स ही ऑफ-रोडर कार आहे. ही एसयूव्ही थारच्या 3-दरवाजा मॉडेलपेक्षा खूपच वेगळी आहे.

महिंद्रा थार रॉक्सची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप-व्हेरियंटची किंमत 22.49 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच्या 4*4 प्रकारांची किंमत 18.79 लाख रुपयांपासून सुरू होते. महिंद्राने अलीकडेच लिलावात पहिली थार रॉक्स लॉन्च केली होती.

हेही वाचा:

सर्वसाक्षी तो परमेश्वर आणि इथले राजकारण!

महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार निवडणूक? कधी लागणार आचारसंहिता?

सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत