पुन्हा वंदे भारत ट्रेनवर हल्ला! अनेक डब्यांचं नुकसान, खिडकीच्या फोडल्या काचा

भारतातील सेमी हायस्पीड ट्रेन(train) वंदे भारत सर्वाधिक लोकप्रिय गाडी ठरत आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण वंदे भारतमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र या गाडीवर दगडफेकीच्या घटना अधूनमधून होत असतात.

आता हिमाचल प्रदेशातील अंब-अंदौरा येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर(train) उना येथील बसल येथे अज्ञातांनी दगडफेक केली. रेल्वेच्या डब्यावर दगडफेकीमुळे दोन डब्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. लोको पायलटकडून मिळालेल्या माहितीनंतर सीआरपीएफसह उना रेल्वे पोलिसांनी दोन्ही पथके बसल येथे पोहोचली आणि स्थानिक लोकांची चौकशी सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्यातून सहा दिवस चालणारी वंदे भारत ही गाडी शनिवारी (5 ऑक्टोबर) दुपारी एक वाजता अंब-अंदौराहून दिल्लीला रवाना झाली. 18 किलोमीटरचा प्रवास करून गाडी बसल येथे पोहोचली तेव्हा अज्ञातांनी दगडफेक केली. यानंतर लोको पायलटने या प्रकरणाची माहिती अंबाला विभागाला कळताच सीआरपीएफसह उना रेल्वे पोलिसांनी तातडीने बसल गाठले.

दोन्ही पथकांनी बसल येथील स्थानिक लोकांची चौकशी तर केलीच, पण पनोहसह आसपासच्या गावांमध्ये जाऊन अनोळखी व्यक्तींचा शोध घेतला, मात्र यश मिळू शकले नाही. रेल्वे पोलीस या प्रकरणाबाबत पूर्णपणे गंभीर असून दगडफेकीमागील कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

उना येथील रेल्वे चौकीचे प्रभारी मोहिंद्र सिंह यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बसल येथे पोहोचल्यानंतर स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली. रेल्वे पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफची टीमही त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. असे करणाऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

हेही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा?

हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री झळकणार म्युझिक व्हिडिओमध्ये

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी Good News; लालपरीच्या ताफ्यात आणखी 2500 गाड्या दाखल होणार