‘सॉरी मम्मी, पप्पा…’ लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि…

उज्ज्वल भवितव्यासाठी फार कमी वयापासूनच अनकेजण स्वप्न(dream) पाहू लागतात. मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा पैशांची चणचण असणारं एखादं कुटुंब असतो, या सर्वच कुटुंबांतील तरुण पिढी भविष्यात यश संपादन करून सर्व सुखसोयी आणि एक सुरेख आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहते.

पण, याच स्वप्नांचा(dream) पाठलाग करत असताना काहीजण मात्र अनेक अडचणींच्या दबावाखाली येत चुकीची पावलं उचलतात.लातूरमधून अशीच एक घटना समोर आली, जिथं आर्थिक विवंचनेतून 17 वर्षीय विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचललं. लातूरमधील या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली.

उपलब्ध माहितीनुसार ही मुलगी मुळची धाराशिव जिल्ह्यातील विजोरा या गावातील होती. लातूरला ती शिक्षणासाठी आली होती. घरची परिस्थिती सुरुवातीपासून बेताची. तरीदेखील तिच्या आई-वडिलांनी तिला लातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला होता. दहावीत 100 पैकी 100 गुण घेतले असल्यामुळे ती शिक्षणात उज्वल भविष्य काढेल असा तिच्या आई वडिलांना विश्वास होता.

प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा, वसतीगृहात राहण्याचा आणि खानावळीसह इतर खर्च जास्त होत असल्याने घरातल्या लोकांची ओढाताण होत असल्याचा खर्च आणि परिस्थितीची तिला जाणीव झाली होती. याबाबत ती आपल्या आईकडे सातत्याने नाराजीसुद्धा व्यक्त करत होती.

सरतेशेवटी कुटुंबाची होणारी ही आर्थिक विवंचना पाहून या मुलीनं अखेर टोकाचं पाऊल उचललं आणि वसतीगृहातील स्वतःच्या रूममध्ये गळफास घेत तिने आयुष्य संपवलं. प्राथमिक तपासातून यासंदर्भातील माहिती समोर आली. ‘सॉरी मम्मी पप्पा’ असं लिहिलेली एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये सापडल्याचंही सांगितलं जात आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आता पुढील तपाल पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

JioCinema आणि Disney Hotstar यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला काठी तुटेपर्यंत मारले, Viral Video

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी