“मी शिवसेना सोडली तरीही मी बाळासाहेब ठाकरेंचाच शिवसैनिक आहे” – परशुराम उपरकर

विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे(politics) यांनी पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढत असतानाच राणेंनी उपरकरांचा देखील चांगलाच समाचार घेतला होता. नितेश राणेंच्या या टीकेला परशुराम उपरकर यांनी पलटवार केला आहे.

उपरकर म्हणाले की, आमदार नितेश राणे(politics) यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे. मी राणेंना सोडून गेलो असा उल्लेख करणाऱ्या नितेश राणे यांनी त्यावेळी राजकारण समजण्याएवढे आपले वय तरी होते का? हे प्रथम पहावे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून कायमच होतो.

मात्र आमदार राणे यांचे वडील नारायण राणे यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. नंतरच्या कालावधीत मी शिवसेना सोडली असली तरीही मी बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक म्हणून कायमच राहिलो, अशा शब्दांत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नितेश राणेंवर पलटवार केला आहे.

राजकारणातील पूर्व इतिहास माहिती नसताना आमच्यावर टीका करण्याचे असे प्रयत्न केल्यास संपूर्ण पूर्व इतिहास समोर आणावा लागेल. मला कोणीही शिवसेनेतून हाकललेले नाही. मी त्यावेळी स्वतःहून शिवसेना सोडली होती. मात्र नारायण राणे मुख्यमंत्री असताना पासूनच मी एकाच पक्षात असलो तरीही अंतर राखून होतो. अशा स्थितीत माझ्या बाबत बोलताना विचारपूर्वकच वक्तव्य करावे. अन्यथा पूर्व इतिहास आणि माझे प्रतिज्ञापत्र जनतेसमोर आणावे लागेल असे श्री. उपरकर यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. दरम्यान कणवलीत महायुतीची सत्ता कायम राहणार. दर पाच वर्षानंतर प्रत्येकजण पक्ष प्रवेश करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही. असं भाजप प्रवक्ते आणि आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?

‘सिंघम अगेन’मधील पहिल्या गाण्याने यूट्यूबवर उडवली खळबळ!