मोखाड्यातील ज्येष्ठ वनौषधी तज्ज्ञ आणि समाजसेवक नवसू महादू (valvi)वळवी यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने आदिवासी समाज आणि मोखाडा तालुक्याला अपूरणीय हानी पोहोचली आहे.

दीपक गायकवाड, मोखाडा: एक तेजोमय ज्योत म्हणून संपूर्ण आयुष्य इतरांची सेवा करण्यासाठी समर्पित करणारा एक कर्मयोगी, उत्तम विचारवंत, सर्जनशील वनौषधी अभ्यासक(valvi) आणि खरा समाजसेवक असलेला नवसू महादू वळवी हा असामान्य व्रतस्थ आदिवासी अवलिया आज अनंतात विलीन झाला आहे.मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात 2 लहान भाऊ 3 मुली आणि 9 नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजा बरोबरच तमाम मोखाडा तालुक्याची अपरिमित हाणी झालेली आहे.
तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडल्यानंतर त्यांनी आपल्या आदिवासी बांधवा मधील व्यसनाधीनता दूर करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे काम व्यापक स्वरूपात केलं आहे. (valvi)सामाजिक बांधिलकीतून सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्र देवबांध येथे कार्य करत असताना सार्वजनिक गणेशोत्सव एक गाव एक गणपती, अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची जाण ठेवत सोमय्या परिवाराद्वारे त्यांना पुरस्कृत करण्यात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक समर्पित कार्यकर्ता म्हणून त्यांना डॉक्टर हेडगेवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
वनौषधींचा शोध घेत संपूर्ण आयुष्य व्रतस्थपणे जंगलात वेचणारे नवसू महादू वळवी यांनी हिमालय ते कन्याकुमारी असा विविध भागातील जंगल संपत्तीचा सखोल अभ्यास करत प्रवास केला आहे.तेथील वनस्पतींचे उत्तम ज्ञान घेतले असून वनस्पती शास्त्राचे एक चालते बोलते विद्यापीठ असणाऱ्या या व्यक्तीकडे मुंबई पुण्याहून वनस्पतींची माहिती घेण्यासाठी अनेक संशोधक येत होते अतिशय उत्तमपणे वनस्पती शास्त्राची माहिती ते विद्यार्थ्यांना देत एक उत्तम वैदू म्हणून विविध आजारांवर ते वनौषधी देत होते त्यांच्या या कार्याबद्दलच अंबरनाथ संस्थेद्वारे दधिची हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. निसर्ग आणि त्याचे संगोपन या दृष्टीने वनांचे महत्त्व आणि वनस्पतींचे जतन संवर्धन व वनस्पतींचे महत्त्व जाणणाऱ्या या व्यक्तीने आपल्या अवतीभोवती जंगल कसं जिवंत राहील यासाठी मेहनत घेतली त्यांच्या या कार्यातूनच त्यांना वनबंधू हा पुरस्कार देण्यात आला.
कर्जतमध्ये ट्रॅक्टरवरील आरटीओ कारवाई तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने शिथिल
आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान असणाऱ्या नवसू महादू वळवी यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करत त्यांचे ज्ञान पुढील पिढीसाठी संगोपित करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा आदिवासी व औषधी उपचार संघ संस्था स्थापन केला आहे.त्या माध्यमातून पालघर नासिक जिल्ह्यातील आदिवासी वैदुंना एकत्र करत वनौषधी यांचे जतन आणि संवर्धन याविषयीचे अव्याहत प्रशिक्षण दिले आहे.आदिवासी बांधवांना आपल्या देव देवता यांची माहिती व्हावी आणि आदिवासींचा इतिहास शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक देवस्थान भेटीचा मार्ग अवलंबला होता.
दरम्यान त्यांनी गुजरात , दादरा नगर हवेली या भागातील आदिवासींचे देवस्थान येथे यात्रा करुन ैवतांची माहिती जाणून घेतली आहे.केवळ एका विशेष समाजापुरतेच मर्यादित न राहता नवसू महादू वळवी यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व समाजासाठी एक व्यापक कार्य केले आहे.अशा कर्मयोगाचा इहलोकाचा प्रवास दोन जुलै रोजी संपला असला तरी एक विद्वान तपस्वी अवलिया आपल्या विचारांतुन आणि वाटलेल्या ज्ञानांतून आजही जिवंत असल्याची प्रतिक्रिया संपूर्ण पालघर जिल्ह्यांतून उमटत आहे.
हेही वाचा :
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!
‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे
‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ