अभिनेत्री(actress) नवनीत निशान हिचा आज 25 ऑक्टोबर रोजी 59 हा वाढदिवस आहे. नवनीत निशानने 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने धर्मेंद्र, आमिर खान आणि अजय देवगण यासारख्या दिग्गज स्टार्ससोबतही स्क्रिन शेअर केली आहे.
नवनीत निशानने हिंदी चित्रपटांसह पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील तारा मालिकेतील तारा या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. 1993 ते 1997 या काळात या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. नवनीतने बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आमिर खानसोबत शुटिंग करतानाचा रंजक किस्सा अभिनेत्रीने शेअर केला.
अभिनेत्री(actress) नवनीत निशान ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. एका मुलाखतीत नवनीत निशानने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगितला होता.
‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटामध्ये नवनीतच्या भूमिकेचं नाव ‘माया’ होतं. आमिर खानशी लग्न करण्याची मायाची इच्छा असते आणि त्यासाठी ती प्रयत्न करते. या चित्रपटात नवनीत आणि आमिर यांचा एक किसिंग सीन होता, जो नंतर चित्रपटातून हटवण्यात आला.
मुलाखतीत नवनीतने सांगितलं की, एक खूप क्यूट सीन चित्रपटातून हटवण्यात आला. आमचा साखरपुडा झाल्यानंतर मी त्याला घ्यायला जाते आणि तेव्हा मी त्याच्या गालावर किस केलं होतं. त्यामुळे त्याच्या गालावर लिपस्टिकचा मार्क बनला. यानंतर आमिर बोलला की, हे कायम ठेवावं लागेल. आमिरने पूर्ण दिवसात माझ्याकडून 7 ते 8 वेळा मला किस करायला लावलं. मी घरी आल्यावर माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगितलं की, मी पूर्ण दिवस आमिर खानला किस केलं. मला लॉटरी लागली.
जान तेरा नाम चित्रपटातून नवनीत निशानने रोनित रॉयसोबत बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात ती सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत होती. नवनीत निशान दिलवाले, राजा हिंदुस्तानी, ये लम्हे जुदाई के, हम हैं राही प्यार के, अकेले हम अकेले तुम, तुम बिन, आपको पहले भी कही देखा हैं या चित्रपटांमध्ये झळकली आहे. अभिनेत्री नवनीत निशानने तारा आणि कसोटी जिंदगी की या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा :
विधानसभा निवडणुकीच असं हे “करवीर” महात्म्य
अजितदादांची जबरदस्त खेळी, मविआतील ‘या’ बड्या नेत्यांविरोधात टाकला मोठा डाव
एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक; ‘या’ नेत्याचा मोठा आरोप