वडिलांच्या ‘त्या’ वाक्यामुळे लेकीचं आयुष्यचं बदललं; लकी चौहान झाल्या IPS, वाचा प्रेरणादायी प्रवास

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाचे भलं व्हावं असं वाटतं असतं.(wellversed) त्यामुळे मुलांना वेळोवेळी योग्य वळण लावण्याचे काम ते करतात. आईवडिलांचं ऐकल्यावर मुलांचं नेहमी चांगलंच असतं. असंच काहीस आयपीएस लकी चौहान यांच्यासोबत झालं. वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी (UPSC Exam)परीक्षेची तयारी केली आणि परीक्षा क्रॅकदेखील केली.

गावात ॲम्बुलन्स नाही, गरोदर बायकांना झोळीतून न्यावं लागतं;(wellversed) पण जिद्दीने नीट क्रॅक केली, आदिवासी पाड्यातले ‘ते’ तिघे होणार डॉक्टर
लकी चौहान यांचा प्रवास
लकी चौहान या मूळच्या उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील खुर्जा गावच्या रहिवासी. त्यांचे वडिल रोहताश सिंह चौहान हे प्रॉपर्टी डीलर आहेत तर आई सुमन लता चौहान शिक्षिका आहेत. लकी चौहान या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हे यश मिळवलं

वडिलांच्या एका वाक्याने संपूर्ण आयुष्य बदललं
मिडिया रिपोर्टनुसार, लकी चौहान या जेव्हा नर्सरीच्या क्लासमध्ये होत्या.(wellversed) तेव्हा त्यांना एका स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला होता. तेव्हा त्यांना डीएम आणि एसपी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हे बघून लकी यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, तुलादेखील एसपी किंवा डीएम बनायचे आहे. ही गोष्ट लकीला खूप भावली आणि त्यांनी मोठं होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे ठरवले.

आधी डॉक्टर झाली, संसार अन् मुलाला सांभाळून दिली UPSC; दुसऱ्याच प्रयत्नात यश; डॉ. प्रगती वर्मा यांचा प्रवास

लकी चौहान यांना १२वीपर्यंतचे शिक्षण सायन्समधून केले. यानंतर त्यांनी इंग्लिश लिटरेचर आणि इतिहास विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागली. केंद्रीय मंत्रालयात त्या असिस्टंट वेलफेअर अॅडमिनिस्ट्रेटर पदावर जॉइन झाल्या. परंतु त्यांचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते. नोकरीसोबतच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

नोकरी करता करता लकी चौहान यांनी यूपीएससी (UPSC)परीक्षेची तयारी केली. तीन वर्षानंतर त्यांनी निवड झाली. २०१२ मध्ये त्यांना ऑल इंडिया रँक २४६ मिळाली.

हेही वाचा :

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!

‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ