कोकणातील पारंपरिक पदार्थ! ओल्या नारळाच्या दुधाचा वापर करून झटपट बनवा चविष्ट हलवा, मुलांसाठी बनवा गोड पदार्थ

ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.(simple) आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ओल्या खोबऱ्याचा दुधाचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

कोकणातील पारंपरिक पदार्थ! ओल्या नारळाच्या दुधाचा वापर करून झटपट बनवा चविष्ट हलवा
कोकणातील पारंपरिक पदार्थ! ओल्या नारळाच्या दुधाचा वापर करून झटपट बनवा चविष्ट हलवा

कोकणात मागील अनेक वर्षांपासून तांदूळ, ओलं खोबर, मासे, कोकम इत्यादी पदार्थांचा(simple) वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणाच्या ताटात कोणताही भाजी पाहिल्यानंतर त्यात भाजीमध्ये ओलं खोबर हे असतंच. ओल्या खोबऱ्याचा वापर करून तिखट आणि गोड असे दोन्ही पदार्थ बनवले जातात. नेहमीच तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून चविष्ट हलवा बनवू शकता. नारळाच्या दुधाची चव आणि सुगंध सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. याशिवाय नारळाच्या दुधाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. लहान मुलांना नेहमीच बाजारातील गोड पदार्थ खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया नारळाच्या दुधाचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.
पिकलेली खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी

साहित्य:
ओल्या खोबऱ्याचा किस
पाणी
गूळ
कॉनफ्लॉवर
तूप
वेलची पावडर
केळीच पान
बदाम
आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा शिंगाड्याचे पिठाचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या रेसिपी

कृती:
ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात(simple) नारळाचा किस घेऊन त्यात थोडस पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घ्या. वाटून घेतलेली पेस्ट कॉटनच्या कपड्यावर ओतून गाळून घ्या.
नारळाचे दूध काढताना त्यात जास्त पाणी घालू नये. नारळाच्या दुधात किसलेले गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
वाटीमध्ये दूध घेऊन त्यात कॉनफ्लॉवरची पेस्ट टाकून मिक्स करा. त्यानंतर गरम दुधात तयार केलेली पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
उकळी आल्यानंतर दुधात वेलची पावडर आणि काजू बदामाचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
गूळ घालून मिक्स करून घेतलेले दूध टाकल्यानंतर मिश्रण हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात होईल. डब्यामध्ये तूप लावून त्यावर केळीचे पान ठेवा.
केळीच्या पानाला सुद्धा तूप लावून घ्यावे. त्यानंतर तयार केलेले मिश्रण डब्यात ओतून घ्या. १० मिश्रण ठेवून मिश्रण व्यवस्थित सेट होईल.
सुरीच्या सहाय्याने हलव्याचे तुकडे करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला नारळाच्या दुधाचा हलवा.

हेही वाचा :

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!

‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ