वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान

शरीर कायम हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे.(water) वयाच्या ६० व्या वर्षीसुद्धा हेल्दी आणि तरुण दिसण्यासाठी पाणी पिण्याचे हे नियमित फॉलो करावे. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

शरीर कायम निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.(water) पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते. शारीरिक हालचाली कायमच सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित 7 ते 8 ग्लास पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासोबतच कायम फिट आणि तरुण राहण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. अनेक लोक कायमच निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट, स्किन केअर प्रॉडक्ट किंवा महागडा डाएट घेतात. मात्र हे उपाय फारकाळ टिकून राहत नाही. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट नाही तर भरपूर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

दारूमुळे सडलेले लिव्हर आतून होईल चकाचक स्वच्छ! रोजच्या आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, फॅटी लिव्हरचा धोका होईल कमी

पाणी हे केवळ तहान भागवण्यासाठी नाहीतर शरीराचे कार्य निरोगी(water) आणि सक्रिय ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. बऱ्याचदा जास्त वेळ बाहेर फिरून आल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाणी पिण्याचे काही सोपे नियम सांगणार आहोत. पाणी पिताना हे नियम नियमित फॉलो केल्यास तुम्ही वयाच्या ७० व्या वर्षीसुद्धा निरोगी आणि सुंदर दिसाल.

दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा:
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. यामुळे तुमचे पोट आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नेहमी एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन केल्यास दिवसभरात पोटात साचून राहिलेले अन्नपदार्थ बाहेर पडून जातील. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही. यामुळे केवळ शरीराचं नाहीतर चेहऱ्यावरील चमक वाढते.

एक एक घोट पाण्याचे सेवन:
बाहेरून फिरून आल्यानंतर किंवा थकून आल्यानंतर सर्वच ग्लासात पाणी घेऊन एका घोटात पाणी पितात. मात्र असे न करता हळूहळू एक एक घोट पाणी पिणे आवश्यक आहे. घाईगडबडीमध्ये पाणी प्यायल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. एक एक घोट पाणी प्यायल्यामुळे लाळेतील एंझाइम्सही पोटात जातात, ज्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. तसेच डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या सुद्धा कमी होते. त्यामुळे नियमित हळू आणि आरामात पाणी प्यावे.

महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल गुलाबाच्या पाकळ्यांचे गुलकंद! आरोग्यासंबंधित ‘या’ समस्यांपासून मिळेल सुटका

आरोग्यासाठी थंड पाणी हानिकारक:
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये थंड पाण्याचे सेवन केले जाते. थंड पाणी प्यायल्यामुळे तेवढ्या पुरते बरे वाटते. पण थंड पाणी आरोग्यासाठी चांगले नाही. सतत थंड पाण्याचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. याशिवाय सर्दी, खोकला आणि डोकेदुखीची समस्या उद्भवते. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे नेहमीच नैसर्गिक तापमानातील पाणी प्यावे.

हेही वाचा :

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी घेतला सर्वात मोठा निर्णय!

‘आवाज मराठीचा’: 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; राज्याचं लक्ष ५ जुलैच्या ऐतिहासिक सभेकडे

‘बाहेर पडू नका…’ टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलबाहेर संशयास्पद वस्तू सापडल्याने खळबळ