उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी! शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘सत्ता त्यांच्या हातात…’

विधानसभा निवडणुकीला(polities) काहीच दिवस शिल्लक असताना प्रचार, सभा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. राज्यातील सर्व पक्ष रिंगणात उतरले आहेत. राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे, अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी येथे काल(सोमवारी)जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी उद्धव ठाकरे जाताना निवडणूक (polities)अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यावरून उध्दव ठाकरे संतापले, त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती प्रसारीत केला आहे, त्याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांनी माझी सोडून आणखी कोणाची बॅग तपासली असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या प्रकरणावर  शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, सत्ता त्यांच्या हातात आहे, सत्तेचा कसा उपयोग करायचा हे त्यांच्या ठरवलेलं आहे, विरोधकांना त्रास देण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, त्यांचा त्रास सहन करावा लागेल. यावर नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. सामान्य लोकांना ही कळतं, विरोधकांना असा त्रास देणं लोकांना ही फारसे आवडेल असे नाही, मात्र या गोष्टीचा निवडणुकीवर परिणाम होईल असे नाही, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा राज्यभरात होत आहेत, त्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘राज्यात जास्त सभा होत असतील तर चांगले आहे. कारण लोकसभेच्या वेळेस ते सोळा ठिकाणी आले. त्या पैकी अकरा जागांवर पराभव झाला होता, सभा घेणे  लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे’. 

2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 उमेदवार निवडून आले होते, सर्व आमदार अजित पवार गटात गेल्यानं शरद पवारांनी पुन्हा नव्याने सुरवात करावी लागत आहे

माकपच्या उमेदवार पासून शरद पवारांच्या प्रचाराची सुरवात होणार
सकाळी 10.30 वाजता कळवण सुरगाणा मतदारसंघात माकप चे उमेदवार जे पी गावित यांच्यासाठी पवारांची पहिली सभा

यानंतर दिंडोरी मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्यासाठी सभा
12.30 वाजता

निफाड मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल कदम यांच्यासाठी पिंपळगाव मध्ये सभा
दुपारी 2 वाजता 
 
येवला विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या विरोधातील उमेदवार माणिकराव शिंदें यांच्या प्रचारासाठी सभा
3.00 वाजता

हेही वाचा :

Air India च्या उड्डाणादरम्यान हिंदू, शीख प्रवाशांना…; खाण्यापिण्यासाठीचा नवा नियम लागू

सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर

‘सुन लो ओवैसी तिरंगा…’ ; मुंबईतल्या सभेत पाकिस्तानचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल