१०० टक्के गुण मिळवलेली मुलेही पॉलिटेक्निकच्या वाटेवर; यंदा ५ वर्षांतील विक्रमी नोंदणी

अभियांत्रिकी करण्याची इच्छा आहे, पण शुल्क परवडत नाही,(marks)अशा कचाट्यात सापडणाऱ्या सर्वसामान्य घरांमधील पॉलिटेक्निकमधून मुलांसाठी डिप्लोमा अभ्यासक्रम हा पर्याय अत्यंत व्यवहार्य मानला जातो. दहावीनंतर हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली असून, विशेष म्हणजे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचा पर्याय खुणावत आहे. यंदाही दहावीत शंभर टक्के मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकसाठी अर्ज दाखल केले आहेत. तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ९,५५७ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पॉलिटेक्निकसाठी सर्वाधिक म्हणजेच १,३६,०३४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

पॉलिटेक्निक हा केवळ पदविका अभ्यासक्रम नाही. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची कवाडे खुली होतात. विशेष म्हणजे सध्या इंडस्ट्रीत हव्या असलेल्या कौशल्यांवर (marks)आधारित या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी रोजगारक्षम बनतात. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमांसाठीच्या नोंदणीत वाढ झाल्याचे निरीक्षण तंत्रशिक्षण संचालनालयाचे डीटीई संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी नोंदवले.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद वाढावा, यासाठी डीटीईतर्फे राज्यातील शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी थेट संवाद साधण्याचे प्रयत्न केल्याचे डॉ. मोहितकर यांनी सांगितले. संचालनालयाने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि जिल्हा पातळीवर ‘स्कुल कनेक्ट’ उपक्रम राबवला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पॉलिटेक्निक विषयी जागरूकता वाढली असून त्याचा परिणाम नोंदणीवर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदा नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना मासिक एक लाख रुपये वेतनाचे पॅकेज मिळाले. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळालेले हे सर्वाधिक पॅकेज असून त्यामुळे विद्याथ्यांचा या पदविका अभ्यासक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत (marks)असल्याचेही डॉ. मोहितकर यांनी सांगितले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने के स्किम अंतर्गत नवीन अभ्यासक्रम राबवले असून, यामध्ये थ्रीडीप्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आयओटी, रोबोटिक्स यांसारख्या नवतंत्रज्ञानांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील आठ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलंन्स’ उभारण्यात येणार आहेत.

राज्यातील १८५ पॉलिटेक्निक संस्थांमध्ये मराठी-इंग्रजी द्विभाषिक माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ९५,५११ प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ४१ टक्के विद्यार्थी ३९,६८९ द्विभाषिक माध्यमात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक साहित्य, पुस्तके, प्रेझेंटेशन, हे मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिले आहे. पॉलिटेक्निक शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या आहेत.

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट