राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जमा झाले आहेत. मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैेसे कधी जमा होणार याची सर्व महिलांना प्रतीक्षा आहे.
अशातच आता ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्यावर आहे त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा(Yojana) लाभ मिळणार नाही. कारण लाडक्या बहीण योजनेत कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नसल्याचं सरकारने म्हंटल आहे. तसेच लाडक्या बहीण योजनेसाठी जे निकष आधीचे आहेत तेच निकष कायम राहणार आहेत. यासंदर्भांत सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात मात्र तरी देखील त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र विधानसभा निवडणुकीत या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र दुसरीकडे महायुती सरकारने विरोधकांना प्रत्युत्तर दिल्यानं या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती.
हेही वाचा :
उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेनी मौन सोडलं
“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!
“सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या यांचा धक्कादायक निर्णय, राजकीय वातावरणात खळबळ”