264 ग्रा. पं. वर येणार महिला राज, जिल्ह्यातील 8 ठिकाणी आरक्षण सोडत शांततेत

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक(post paid) सूचनांना केंद्रस्थानी ठेवून गुरुवारी (दि.3) जिल्ह्यात 8 ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली. वर्धा जिल्ह्यात 8 ठिकाणी शांततेत आरक्षण सोडत पार पडली.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांना (post paid)केंद्रस्थानी ठेवून गुरुवारी (दि.3) जिल्ह्यात 8 ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली. वर्धा जिल्ह्यात 8 ठिकाणी शांततेत पार पडलेल्या या प्रक्रियेदरम्यान 264 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आठही ठिकाणी पार पडलेल्या प्रक्रियेचे इतिवृत्त जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक (ग्रामपंचायत) विभागाला प्राप्त झाल्यावर ते अंतिम मान्यतेकरिता जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्याकडे सादर केले जाणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या सूचना आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश(post paid) तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार 3 जुलैला वर्धा, सेलू, देवळी, आवीं, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर या 8 तालुक्यांच्या स्थळी तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा घेत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. निश्चित करण्यात आलेले आरक्षण 13 जून 2025 ते 12 जून 2030 या काळाकरिता लागू राहणार आहे.

वर्धा तालुक्यातील 76, देवळी तालुक्यातील 63, सेलू तालुक्यातील 62,हंगणघाट तालुक्यातील 76, समुद्रपूर तालुक्यातील 71, आर्वी तालुक्यातील 69,आष्टी तालुक्यातील 41, तर कारंजा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग यातील महिला सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी निश्चित करण्यात आले.

वर्धा तालुक्यातील नांदरो, खरांगणा गोडे, गोजी, पेठ, वायगाव (नि.), पवनार या ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत अनुसूचित जाती, असे निघाले आहे. पुलई, आमला, आंजी (मोठी), तळेगाव (टा.), कामठी, मांडवा, पिपरी (मेघे) या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिला, असे निश्चित करण्यात आले आहे. तरोडा, झाडगाव व नेरी (पुनर्वसन) या ग्रामपंचायतींचे अनुसूचित जमाती, तर सेलूकाटे, इंझापूर, कुरझडी (जा.), साटोडा या ग्रामपंचायतींचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला, असे निश्चित करण्यात आले. नागापूर, सावली (सा.), धोत्रा (रेल्वे), आमजी मजरा, एकुर्ली, करंजी भोगे, गणेशपूर, रोठा, जाऊळगाव, नटाळा (पु.) नागरिकांचा मागासप्रवर्ग, तर तिगाव, भिवापूर,
बोरगाव (मेघे), लोणसावळी, मदनी, सिंदी मेधे, सालोड (हि.), आष्टा, बोरगाव (ना.), चिकणी, पालोती या ग्रामपंचायतींचे आरक्षण नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, असे निश्चित झाले आहे. सेवाग्राम, बरबडी, उमरी (मेघे), चितोडा, दहेगाव (स्टे.), भुगाव, धोत्रा (का.), नेरी, पुजई, बेलगाव, कुटकी, बोरगाव (सा.), निमगाव, सावंगी (मे.), नालवाडी, वरुड, धामणगाव (वा.), करंजी (काजी) या ग्रामपंचायतींचे आरक्षण सर्वसाधारण, तर वायफड, महाकाळ, दहेगाव (मि.), पडेगाव, धानोरा, येसंवा, पवनूर, भानखेडा, वडद, कुरझडी (फो.), सेलसुरा, मांडवगड, बोदड, केळझर, सिरसगाव (घ.), सोनेगाव (स्टे.), म्हसाळा या ग्रामपंचायतींचे आरक्षण सर्वसाधारण महिला, असे निघाले.

वर्धा तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत गुरुवार 3 जुलैला पार पडली. याच सोडतीदरम्यान वर्धा शहराशेजारील पिपरी (मेघे) येथील अनुसूचित जाती महिला, तर सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीचे नामाप्र स्त्री, असे आरक्षण निघाले आहे. या दोन्ही ठिकाणी यापूर्वीही महिला सरपंच होत्या, आता पुन्हा महिलांना या ठिकाणी संधी मिळणार आहे.

कुठल्या तालुक्यात किती ग्रा. पं. वर महिलाराज ?
वर्धा : एकूण ग्रा. पं. 76 : महिला सरपंच 39
देवळी : एकूण ग्रामपंचायती 63: महिला सरपंच 32
सेलू : एकूण ग्रामपंचायती 62 महिला सरपंच 32
हिंगणघाट : एकूण ग्रामपंचायती 76: महिला सरपंच 39
समुद्रपूर : एकूण ग्रामपंचायती 71 महिला सरपंच 36
आर्वी : एकूण ग्रामपंचायती 69: महिला सरपंच 35
आष्टी : एकूण ग्रामपंचायती 41: महिला सरपंच 21
कारंजा : एकूण ग्रामपंचायती 59: महिला सरपंच 30

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट