जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी(manufacturer) तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या कारवर दमदार डिस्काउंट देत आहे.

आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते.(manufacturer) हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र काम करत असतात. मात्र, कार खरेदी करताना ग्राहकांना फक्त त्याचे फीचर्स किंवा लूक नाही भावत तर डिस्काउंट ऑफर सुद्धा महत्वाचे आहे.
आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी(manufacturer) त्यांच्या नेक्सा डीलरशिप अंतर्गत अनेक लोकप्रिय कार विकते. कंपनी जुलै 2025 पर्यंत या लोकप्रिय वाहनांवर सवलत देत आहे. या ऑफरमध्ये काही मॉडेल्सवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनस आणि ॲक्सेसरीजचा समावेश आहे. कोणत्या मारुती सुझुकी वाहनावर किती सूट दिली जात त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जुलै 2025 मध्ये, मारुती ग्रँड विटारावर 1.85 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच्या MY2024 मॉडेल स्ट्रॉंग-हायब्रिडवर एकूण 1.85 लाख रुपयांपर्यंतची बचत होत आहे. यामध्ये 70,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट, 35,000 रुपयांची एक्स्टेंडेड वॉरंटी आणि 80,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे.
या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 1.65 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच्या डेल्टा, झेटा आणि अल्फा ट्रिम्सवर 57,900 रुपयांपर्यंतच्या डोमिनियन एडिशन ॲक्सेसरीज दिल्या जात आहेत. त्याच वेळी, त्याच्या CNG व्हेरिएंटवर 20,000 रुपयांची कॅश डिस्काउंट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.
मारुती ग्रँड विटाराच्या MY2025 मॉडेल स्ट्रॉंग-हायब्रिड व्हेरिएंटवर 1.45 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. यामध्ये 57,900 रुपयांपर्यंतच्या डोमिनियन एडिशन ॲक्सेसरीजचा देखील समावेश आहे. MY2024 सारखीच ऑफर त्यांच्या MY2025 CNG मॉडेल्सवर दिली जात आहे. भारतीय बाजारात, मारुती ग्रँड विटारा 11.42 लाख ते 20.52 लाख रुपयांच्या दरम्यान ऑफर केली जाते.
Maruti Invicto वर डिस्काउंट
जुलै 2025 मध्ये, मारुती इन्व्हिक्टोवर 1.40 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच्या टॉप-स्पेक अल्फा + ट्रिमवर 1.40 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यासोबतच, झेटा + ट्रिमवर 1.15 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. भारतीय बाजारात, मारुती इन्व्हिक्टोची एक्स-शोरूम किंमत 25.51 लाख रुपये ते 29.22 लाख रुपये आहे.
हेही वाचा :
भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार
Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट