मन, मेंदू आणि आपण

शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आपल्याला वाटतं, ‘मी’ म्हणजे माझं शरीर, माझा मेंदू, आणि माझं मन – सगळं एकाच(job posting sites) पद्धतीने चालतं; पण रोजच्या अनुभवांमध्ये लक्षात येतं, की ही तिघं नेहमीच एका रेषेत चालतील असे नाही. आपला मेंदू काहीतरी सांगतो, आपल्या मनाला काहीतरी वेगळं वाटत असतं, आणि आपली कृती ह्यांच्यापेक्षा वेगळी असते. हे नेमकं असं का घडतं? आणि मग असा प्रश्न पडतो, की हे तिघं इतके वेगवेगळे का वागतात?

मागील दोन लेखात आपण मन आणि मेंदूच्या स्वास्थ्याविषयी बोललो(job posting sites) होतो, आज आपण – मेंदू, मन आणि मी, – या तिन्ही संकल्पना नक्की कशा आहेत हे बघुयात.

मेंदू म्हणजे आपल्या शरीराचं कंट्रोल सेंटर. तो भाषा समजतो, सूचना देतो, आठवणी ठेवतो, भविष्याचा विचार करतो, आणि निर्णय घेतो. आपला मेंदू तर्क, माहिती, आणि सवयींच्या आधारे वागतो. (job posting sites) कोणतीही गोष्ट ‘कशी करायची’ हे आपल्याला मेंदू सांगतो; पण ‘का करायचं’ हे नेहमी सांगत नाही. ‘का करावं’ हे आपलं मन सांगत असतं.

मन म्हणजे केवळ मेंदू नव्हे – ते एक अदृश्य; पण प्रभावी क्षेत्र आहे, जे विचार, भावना, आणि अंतर्मनातल्या स्पंदनांनी भरलेलं आहे. आपलं मन बऱ्याच वेळेला तर्कापेक्षा भावना जास्त समजतं, किंबहुना, भावनांना प्राधान्य देतं, भावना ऐकतं. त्यामुळे मन आणि मेंदू यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला विरोध होताना दिसतो.

मेंदूचा कल बाहेरील जगात असलेल्या डेटाकडे बघून तर्क करून निर्णय घेण्याकडे असतो, आणि मनाचा कल आपल्या आंतरिक जगातल्या भावनिक आणि वैचारिक डेटाकडे बघून भावनांच्या आधारावर निर्णय घेण्याकडे असतो. बऱ्याच वेळेला हे दोन्ही संरेखित नसतात आणि इथे भूमिका असते आपली, आपण नक्की कुणाचं, कसं आणि किती ऐकतो, आणि आपली कृती कुणामुळे जास्त प्रभावित होते.

‘मी’ म्हणजे फक्त शरीर नाही, तर एक वेगळीच जाणीव. मी म्हणजे फक्त physical presence नाही. खरा मी, किंवा खरी मी म्हणजे एक निरीक्षक, जो मनाच्या आणि मेंदूच्या हालचाली बघतो, समजतो, आणि निर्णय घेतो. हा ‘स्व’ अनेक वेळा या दोन संवादात सापडतो – मेंदूच्या तार्किक संवादात, आणि मनाच्या भावनिक संवादात !

हे तिघं एकत्र का चालत नाहीत?

हे तिघंही स्वतःहून एकत्र चालतील असं क्वचितच घडतं. जेव्हा कधीतरी कुठल्या प्रसंगी असं घडतं, तेव्हा आपल्याला वाटतं, की अरे हे तर अगदी सहजच होऊन गेलं, मग तो एखादा निर्णय असो, एखादं काम असो, एखाद्या विषयाचा अभ्यास असो, एखादं प्लांनिंग असो. पण बऱ्याच वेळेला हे आपल्या नकळत घडतं, जाणीवपूर्वक नाही. अधिकांश वेळेला आपल्याला असा अनुभव येतो, की आपला मेंदू आणि मन दोन वेगळ्या मार्गांवर आहेत. आणि असं घडण्याची तीन मुख्य कारणं असतात.

भिन्न गती : आपला मेंदू फार झपाट्यानं काम करत असतो. तो एक प्रोसेसर आहे आणि त्याचा उद्देशच असतो फास्ट काम करण्याचा. मेंदू हा survival instinct वर काम करत असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीत मेंदूची urgency आणि त्याची गती जास्त असते. त्याउलट मन अधिक हळू गतीनं काम करतं.

मनाला खोल जायला आवडतं, कारण त्याला survival च्या पुढे जाऊन evolution हवं असतं, आणि आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अर्थ हवा असतो. प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करून, त्यातील चूक बरोबर समजून घेऊन, मला हे करायला आवडतं आहे का? किंवा करायला आवडेल का? आणि मुळात मी हे का करणं आवश्यक आहे? अशा सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळाल्याशिवाय आपलं मन निर्णय घेत नाही.

भिन्न भाषा : मेंदू बोलतो लॉजिकमध्ये आणि मन बोलतं संवेदनांमध्ये, आणि ‘आपण’ या दोघांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या दोघांची भाषा वेगळी आहे, ही जाणीव सर्वप्रथम आपल्याला असणं महत्त्वाचं असतं.

तणाव आणि विसंवाद : आपण फक्त मेंदूचं ऐकतो, तेव्हा मन दडपलं जातं. जेव्हा आपले निर्णय फक्त मन चालवतं, तेव्हा निर्णय अस्थिर होतात. या दोन्हीच्या ताळमेळामधूनच आपण योग्य दिशा निवडू शकतो आणि त्यातूनच योग्य कृती घडत असते.

मन आणि मेंदू दोघांना ऐकून एखादा निर्णय घेताना दोघांची बाजू ऐका – ‘तर्क’ आणि ‘भावना’ दोन्ही समजून घ्या.
ध्यान करून किंवा लेखन सराव करून
शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा मनातलं लिहिणं, हे तिघांमध्ये संवाद घडवून आणतं
तिघांचं एकत्र चालणं म्हणजेच आत्मसंवाद. मेंदू विचार देतो, मन अर्थ देतं आणि आपण दिशा ठरवत असतो. ‘मानसभान’ ठेवून जेव्हा या तिघांना आपण एकत्र आणतो – संवादातून, सजगतेतून, आणि आत्मप्रामाणिकपणातून – तेव्हाच आयुष्य अधिक स्पष्ट, स्थिर आणि अर्थपूर्ण वाटतं.

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट