Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे

रिकेतील प्रसिद्ध टीव्ही स्टार, सोशल मीडिया व्यक्तिमत्व आणि किम कार्दशियनची(media) बहीण ख्लो कार्दशियनने नाकाची राइनोप्लास्टी सर्जरी केली आहे. ही सर्जरी केल्यानंतर नाकाचा आकार बदलतो. जाणून घ्या राइनोप्लास्टी सर्जरी म्हणजे काय?

सुंदर दिसण्यासाठी महिलांसह पुरुष देखील सतत काहींना काही ट्रीटमेंट करून घेतात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही स्टार, सोशल मीडिया व्यक्तिमत्व (media) आणि किम कार्दशियनची बहीण ख्लो कार्दशियनने नुकतीच नाकाची शस्त्रक्रिया केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. तिने चेहऱ्यावर केलेल्या शस्त्रक्रियेची उघडपणे माहिती दिली आहे. तिने सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल प्रक्रियांबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे. सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट संपूर्ण त्वचेचे रूपच बदलून टाकतात. ख्लोईने केलेल्या शस्त्रक्रियेला राइनोप्लास्टी असे म्हणतात. ही एक नाकाची शस्त्रक्रिया आहे. अनेक लोक नाकाची बिघडलेली रचना सुधारण्यासाठी राइनोप्लास्टी करून घेतात. प्रामुख्याने ही शस्त्रक्रिया अनेक लोक कॉस्मेटिक सर्जरी म्हणून सुद्धा करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राइनोप्लास्टी म्हणजे काय? यामुळे नेमके काय फायदे होतात, याबाद; सविस्तर माहिती सांगणार आहोत.

राइनोप्लास्टी म्हणजे काय?
राइनोप्लास्टी सर्जरी म्हणजे एक प्रकारची प्लास्टिक सर्जरीच आहे.(media) यामध्ये नाकाचा आकार आणि रचना बदलली जाते. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्री आणि कलाकारांनी नाकाची सर्जरी करून घेतली आहे. तर अनेक लोक श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी राइनोप्लास्टी सर्जरी करून घेतात. राइनोप्लास्टी ही नाकाची सर्जरी आहे. यामुळे नाकाची रचना सुधारते.

राइनोप्लास्टी कोण करू शकते?
जन्मापासून नाकाची समस्या असलेले
लुक सुधारण्यासाठी
नाकाचे हाड वाकडे असेल तर
श्वास घेण्यास त्रास होत असल्यास
नाकाचे हाड तुटल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी राइनोप्लास्टी केली जाते.
राइनोप्लास्टी काय करते?
ज्या व्यक्तींचे नाकाचे हाड वाढलेले किंवा वाकडे असते, अशी लोक राइनोप्लास्टी सर्जरी करतात. राइनोप्लास्टीया केल्यामुळे नाकाची रचना सुधारते. जर तुमचे नाकाचे हाड वाकडे किंवा ओबडधोबड असेल तर तुम्ही राइनोप्लास्टी करून नाकाचे हाड सरळ करू शकता. तसेच नाकपुड्यांचा आकार वाढल्यानंतर तुम्ही तो कमी करण्यासाठी राइनोप्लास्टी करू शकता. चेहऱ्यानुसार नाकाचा आकार लहान किंवा मोठा सुद्धा करता येतो.

राइनोप्लास्टी करण्याचे फायदे?
राइनोप्लास्टी केल्यामुळे नाकाचा आकार बदलता येतो.
तुमचा चेहरा आधीपेक्षा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतो.
नाकाचे हाड किंवा अंतर्गत सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
श्वासनाच्या समस्या कमी होतात.
मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!

शस्त्रक्रियेदरम्यान काय होते?
राइनोप्लास्टी सामान्यतः स्थानिक किंवा पूर्ण भूल देऊन केली जाते.शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टर नाकाचे हाड किंवा कूर्चा (cartilage) आवश्यकतेनुसार बदलतात.काहीवेळा, त्वचेमध्येही बदल केले जातात.

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट