आय लव्ह यू जानू…., 4 लाख पोटगी मिळण्याचं नक्की झालं; हसीन जहां मोहम्मद शमी विषयी काय म्हणाली?

भारताचा स्टार क्रिकेटर(cricket) मोहम्मद शमी आणि त्याची हसीन जहां यांच्या नात्यात 2018 पासून सर्वकाही आलबेल नाही. दोघांचा घटस्फोटाचा खटला मागील सात वर्षांपासून त्यांचा खटला न्यायालयात सुरु होता. अखेर 3 दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टने मोहम्मद शमीला दरमहा चार लाख रुपये आपल्या पत्नी आणि मुलगी आयर्ना यांच्या घरगुती खर्चासाठी देण्यास सांगितलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शमीची पूर्व पत्नी हसीन जहां हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, यात तिनं शमीवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मोमोहम्मद शमी (cricket)आणि हसीन जहां यांचं लग्न हे 2014 रोजी झालं होतं. लग्नाच्या एक वर्षानंतर 2015 मध्ये दोघांना एक मुलगी झाली जिचं नाव आयरा ठेवण्यात आलं. 2018 मध्ये दोघांच्या नात्यात कटुता आली आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. आता 7 वर्षांनी हायकोर्टाने याबाबत निर्णय ऐकवला आहे. या निर्णयानंतर हसीन जहांने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती ‘तेरे लिए मैं, मेरे लिए तू, तू जाने या मैं जानू’ या गाण्यावर लिपसिंग करताना दिसतेय.

हसीन जहांने सोशल मीडिया हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते जानू. यासोबत हसीनने हार्ट इमोजी सुद्धा पोस्ट केले. हसीनने पुढे लिहिले, ‘माझ्यासारखी पत्नी कुठे मिळेल का? जी एवढ्या प्रामाणिकपणे नातं निभावलं. काळजी करू नकोस जान, शेवटच्या श्वासापर्यंत आपण हे नातं निभावू. फक्त तुला हे निश्चित करायचंय की मजबूत नातं कसं असेल’. हसीन जहांने पोस्टमध्ये मोहम्मद शमीला टॅग केलं आहे.

शमी आणि हसीन जहाँ (cricket)यांचा वाद 2018 पासून सुरू आहे. दोघांचे 2014 मध्ये लग्न झाले होते आणि 2015 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. मात्र 2018 मध्ये हसीन जहाँ यांनी शमीवर अनैतिक संबंध, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि आजतागायत सुरू होते.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार

भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय

Khloe Kardashian ने केली Rhinoplasty शस्त्रक्रिया! जाणून घ्या राइनोप्लास्टी केल्यामुळे त्वचेला होणारे फायदे