कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
शिक्षकांना, सरस्वतीच्या मंदिरातील पुजारी म्हटले जाते.(temple)नवी पिढी घडवण्याचे,जबाबदार नागरिकांच्या माध्यमातून नवा सुबुद्ध समाज तयार करण्याचे पवित्र काम शिक्षक वर्गाकडून होत असते. भारतीय संस्कृतीमध्ये आईनंतर शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रात सदाशिव पांडुरंग साने अर्थात साने गुरुजी यांना शिक्षकांचे प्रेरणास्थान मानले जाते. समाजात शिक्षकांना आजाराचे स्थान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यादान करणाऱ्यांना मास्तर म्हटले जायचे. त्यानंतर मास्तरांना गुरुजी म्हटले जाऊ लागले आणि आता”सर”म्हटले जाते.

माणुस कितीही मोठ्या पदावर गेला आणि त्याला त्याचे”सर”रस्त्यात कुठेतरी भेटले तर त्यांना नम्र होऊन खाली वाकून चरण स्पर्श करणार.मास्तर, गुरुजी, सर अशी अनेक नावे असलेल्या व्यक्तीचा शिक्षक की हा पेशा असतो. अशा पवित्र पेशाला बदनाम करणाऱ्या घटना अजून मधून घडत असतात. खरे तर अशा प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतात पण शिक्षण क्षेत्रातील अशा प्रवृत्तीची समाज अतिशय गांभीर्याने दखल घेत असतो. (temple)कारण इथले विकृत प्रकार समाजाला अपेक्षित, अभिप्रेत नसतात. म्हणून समाज पटकन संतप्त होऊन तो प्रतिक्रियावादी बनतो. गेल्या काही महिन्यात राज्यात विविध ठिकाणी शिक्षकांच्या कडून विद्यार्थ्यांवर अत्याचार, विनयभंग, लैंगिक छळ अशा विकृतीचे हिरीश दर्शन घडवणाऱ्या घटना घडल्या आहेत आणि आजही त्या घरच्यांना दिसतात.
अशा प्रकरणात विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचेही प्रकार घडले आहेत.कागल तालुका हा राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. राजश्री शाहू महाराजांचे जनक घराणे याच कागल मधले. याच कागल तालुक्यातील एका गावात एका शिक्षकांने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे. संतप्त पालकांनी या शिक्षकाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या घटनेची दखल मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने घेतली. (temple)पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे त्यांनी आदर्श दिले. कागल मधील या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. या विकृत शिक्षकाने यापूर्वीही असेच काही प्रकार केले असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ पूर्वी त्यांनी केलेल्या अशा काही घटनांची गांभीर्याने दखल घेतली गेलेली नव्हती.

तेव्हाच त्याच्यावर कारवाई केली असती तर आज त्या विद्यार्थिनीला अशा लांछनास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. संबंधित शिक्षकाच्या विरोधी अशा काही तक्रारी पूर्वी करण्यात आल्या होत्या आणि त्याची दखल घेतली नाही असे जर घडले असेल तर संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली गेली पाहिजे. मुंबईतील एका शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेने सोळा वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसोबत केलेला अनैतिक व्यवहार हा चीड आणणारा आहे. शाळेतील सोळा वर्षाच्या एका विद्यार्थ्याबरोबर ही शिक्षिका जबरदस्तीने लैंगिक व्यवहार करायची. या प्रकरणाने तो विद्यार्थी घाबरून गेला होता.
त्याच्या वागण्यात पडलेला फरक पाहून त्याच्या पालकांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा विकृत प्रकार समोर आला. पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित शिक्षिके विरुद्ध फिर्याद दाखल केली.पोलिसांनी त्या विकृत शिक्षिकेला पोक्सो कायद्याखाली अटक केली आहे. विवेक महादेव राऊत वय 15 हा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यामध्ये वसाडी बुद्रुक या गावचा विद्यार्थी असून तो इयत्ता दहावी मध्ये शिकत होता मंगळवारी गोपाल सूर्यवंशी या शिक्षकाने विवेकला एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर त्याला नीटपणे देता आले नाही म्हणून शिक्षकाने त्याला उठाबशा काढायला सांगितले.
इतकेच नाही तर त्याला त्याच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. भर वर्गात मित्रांच्या समोर शिक्षकांनी केलेला हा अपमान विवेकच्या जिव्हारी लागला. शाळा सुटल्यानंतर त्याने नजीकचे शेत गाठले आणि तेथे स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थी चुकत असतो. त्याला एखाद्या प्रश्नाचे नीटपणे उत्तर देता येत नाही.अशावेळी संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्याला नेमके उत्तर काय आहे ते समजावून सांगणे आवश्यक असते. ते सांगण्याऐवजी विद्यार्थ्याला शिक्षा करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. तळ हातावर छडी मारणे हे सुद्धा समजू शकते पण संबंधित विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का देणे गैर आहे.
पुणे शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग होईल असे वर्तन शिक्षकांच्या कडून घडले आहे. सावित्रीच्या लेकीबद्दलअसे काही घडत असेल तर तेचिंतणीय आहे. मुलींच्या शाळेत शिक्षकाऐवजी शिक्षिकेची नेमणूक केली पाहिजे. अगदीच अशक्य असेल तर मुलींच्या वर्गावर वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना पाठवले पाहिजे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी अधून मधून विद्यार्थिनींशीथेट संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तुम्हास शाळेतील शिक्षकाकडून चांगली वागणूक दिली जाते आहे काय अशी विचारणा केली पाहिजे.
जशी मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे तशीच ती पालकांची सुद्धा आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलीशी वेळ काढून संवाद साधला पाहिजे. तिच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. शाळेतील अनुभवाविषयी तिला बोलते केले पाहिजे. शिक्षकांच्या वर्तनाबद्दल विचारले पाहिजे. अशा काही उपाय योजना सहज करता येऊ शकतात. त्यामुळे अशा विकृत घटनांना आळा बसेल.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय