पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने, नियमित करा सेवन

पोटावर वाढलेली चरबी आणि वाढलेले वजन(weight) कमी करण्यासाठी महिला काहींना काही उपाय करत असतात. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.

काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतात तर काही बाजारात उपलब्ध असलेले प्रोटीनशेक पितात. मात्र याचा फारसा फरक शरीरावर(weight) दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

प्रत्येक स्वयंपाक घरात कढीपत्ता हा असतो. जेवणातील पदार्थ बनवताना किंवा औषध म्हणूनसुद्धा कढीपत्त्याचे सेवन केले जाते. कढीपत्ता खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांनासुद्धा अनेक फायदे होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्यामध्ये विटामिन्स आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. जाणून घेऊया कढीपत्ता खाल्याने आरोग्याला होणारे फायदे.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यास वजन कमी होण्याऐवजी आणखीन वाढू लागते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल. कढीपत्ता खाल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटावर वाढलेली चरबीसुद्धा कमी होण्यास मदत होईल.

पचनक्रिया सुधारते:
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच गॅस, अपचन इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. कढीपत्याच्या पानांमध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळून येतात, जे शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. पोटासंबंधित त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

केसांचे आरोग्य सुधारते:
थंडीच्या दिवसांमध्ये केस गळती मोठ्या प्रमाणात वाढू लागते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला काहींना काही उपाय करतात. मात्र हे उपाय करूनसुद्धा केसांमध्ये काहीच फरक दिसून येत नाही. अशावेळी तुम्ही काढिअपत्याच्या पानांचा वापर करून तेल तयार करू शकता. खोबरेल तेल आणि कढीपत्ता घालून तयार केलेले तेल रात्री झोपण्याआधी केसांच्या मुळांना लावून हळुवार हाताने मसाज करून घ्या. यामुळे केस गळती थांबेल आणि केसांसंबधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. शिवाय यामुळे रक्तात वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते.

कढीपत्त्याच्या रस बनवण्याची कृती:
एक ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात १० ते १२ कढीपत्त्याची पाने टाकून पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या.तयार केलेले कढीपत्त्याचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. यामुळे बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. तयार केलेल्या रसात तुम्ही मध किंवा लिंबाचा रस टाकू शकता.

हेही वाचा :

कोट्यवधी PF खातेदारांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का, ‘पुष्पा’ पुन्हा जाणार तुरुंगात?

‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, काही दिवसांतच होणार मालामाल…