मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री(politics) म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. असे असताना नंतर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. यामध्ये 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता संभाव्य खातेवाटपाची माहिती समोर आली आहे.
महायुतीचे(politics)खातेवाटप ठरल्याची माहिती येत आहे. येत्या 24 तासांत महायुतीच्या खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शिवसेना यादीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची यादी उद्या दिली जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना संपूर्ण खातेवाटपाची यादी देणार आहे.
गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या-त्या पक्षाकडेच राहणार असल्याची शक्यता आहे. भाजपकडे गृह खाते राहणार आहे. तर शिवसेनेकडे नगरविकास खाते राहणार आहे. अजित पवार गटाचे अर्थ खाते कायम राहणार आहे. भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, उर्जा खाते राहणार आहे. शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार आहे. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.16) नागपुरात सुरू झाले आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव होता. एकनाथ शिंदे यांची शिवसेना गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नव्हती. तर भाजप त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार असल्याच्या चर्चा होत्या. असे असताना आता संभाव्य खातेवाटपही समोर आले आहे.
भाजपमधून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेकांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावले यांच्यासह अनेकांची वर्णी लागली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात पार पडला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे कोणते आमदार शपथ घेणार आहे हे समजले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागवार विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. प्रत्येक विभागाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी महायुतीतील पक्षांनी प्रयत्न केला आहे.
हेही वाचा :
भारत फायनल खेळणार की नाही पाकिस्तान ठरवणार!
खळबजनक! १५ वर्षीय मुलाची हत्या; शरीराचे १७ तुकडे करून जमिनीत पुरले
पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने, नियमित करा सेवन