किडनी इन्फेक्शन म्हणजेच पायलोनेफ्रायटिस हा एक गंभीर आजार आहे.(kidneys) ही समस्या लघवीच्या मार्गातून सुरू होऊन थेट किडनीपर्यंत पोहोचू शकतो. जर याकडे वेळेत लक्ष दिलं नाही, तर हा संसर्ग जीवघेणाही ठरू शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये तर किडनी ट्रान्सप्लांटसुद्धा करण्याची वेळ येऊ शकते

किडनी इन्फेक्शनची सुरुवात कशी होते?
बहुतेक वेळा हे इन्फेक्शन मूत्रमार्गातून म्हणजेच युरीन पथातून सुरू होतं. (kidneys) जसं की लघवीच्या ट्यूबमध्ये इन्फेक्शन झालं आणि योग्य उपचार न घेतल्यास ते किडनीत जातं. याची लक्षणं कोणती दिसून येतात ते पाहूयात.
पाठीच्या किंवा कमरेच्या भागात वेदना
सतत किंवा दोन्ही बाजूंनी कंबर-पाठीमध्ये वेदना जाणवणं हे(kidneys) सुरुवातीचं लक्षण असू शकतं. अशा वेदना अचानक होत नसून दीर्घकाळ राहतात.
लघवी करताना जळजळ
जर लघवी करताना जळजळ होणं, दुखणं किंवा अस्वस्थता वाटत असेल, तर हे मूत्रमार्ग किंवा किडनी इन्फेक्शनचं संकेत असू शकतं.
रात्री झोपताना शरीरात 5 लक्षणं दिसली तर सावध व्हा; लिव्हर सिरोसिस असण्याचा धोका
लघवीमध्ये रक्त दिसणं
लघवीमध्ये जर थोडं जरी रक्त आलं, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे किडनीच्या सूज किंवा गंभीर इन्फेक्शनमुळे होतं. यावेळी तातडीनं युरीन चाचणी किंवा KFT करून घ्या.
लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं
किडनी खराब होण्याची प्रक्रिया सुरू असल्यास, शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात. यामुळे दिवसभर थकवा, अंगात उत्साह नसणं आणि सतत झोप लागणं ही लक्षणं दिसतात.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय