यंदाचे वर्ष हे खऱ्या अर्थाने सोनेरी होते यात काही वाद नाही. याचे कारण म्हणजे सोन्याच्या (Gold)दरांनी गाठलेला उच्चांकी भाव. ज्यांनी कोणी कोव्हीड किंवा २ वर्षाआधी सोन्यात गुंतवणूक केली असेल त्यांना नक्कीच या वर्षी सोन्याने सोनेरी परतावा दिला असेल.
खरंतर भारतात नेहमीपासूनच सोन्याला(Gold) गुंतवणुकीपेक्षा भावनिक महत्व जास्त आहे. पण हळहळू काही लोकं सोन्यात गुंतवणूक करू पाहत आहे. याचे कारण म्हणजे ऑक्टोबर 2024 पर्यंत, सोन्याच्या किंमतीत 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले आहे, जी 40 वर्षांतील म्हणजे तब्बल 4 दशकांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
यानंतर नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सोन्याच्या व्यापारात ५ टक्क्यांची घसरण दिसून आली, असे असतानाही सोन्याच्या दरात वार्षिक २८ टक्के वाढ झाली, म्हणजेच त्याचा परतावा २८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. आता येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये सोन्याची कामगिरी कशी असेल याबाबत जाणून घेऊया.
यावेळच्या फेडरल रिझर्व्हमधील बैठकीच्या निर्णयानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे आणि 2025 साठी देखील व्याजदर कपातीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर डॉलरच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम असून त्याचा विपरीत परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. सन 2025 मध्ये मंद आर्थिक धोरणाची शक्यता आहे आणि त्या आधारावर सोन्याच्या किंमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत, त्यामुळे सोने 2600 डॉलर प्रति औंस (ounce) पर्यंत घसरले होते.
सोन्याची टेक्निकल लेव्हल पाहिल्यास, बाजार प्रति औंस $2634 पर्यंत वाढण्याबद्दल आशावादी होते. जर सोने प्रति औंस $2674 च्या वर गेले तर त्याची किंमत $2725, 2780 आणि $2840 प्रति औंस पर्यंत दिसू शकते. मात्र, जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याचे दर घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोन्यामध्ये सध्यातरी घसरण पाहायला मिळते आणि त्यामागील कारण म्हणजे डॉलरची मजबूती. 2024 सारखा सोन्याचा परतावा 2025 मध्ये दिसणार नाही, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहे.
जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सध्या सोने खरेदी करण्यावर आणि त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देत आहेत. सोन्याचा साठा मजबूत करून जियो-पॉलिटिकल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही एक चांगली रणनीती असू शकते, म्हणूनच, जर्मनी, फ्रान्स, चीन आणि भारताच्या मध्यवर्ती बँका देखील त्यांच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ करत आहेत.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी वर्षाचा शेवट गोड, आजपासून १५०० रूपये खात्यात जमा होणार
सोमनाथ सुर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप…
खेळता खेळता घडली भयानक घटना; चिमुकल्याच्या अंगावर बाईक पडली अन्…; VIDEO