CBI मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी भरतीला (Recruitment) सुरुवात करण्यात आली आहे. IT क्षेत्रामध्ये भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. एकूण ६२ रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

नियुक्त उमेदवारांना मुंबई किंवा नवी मुंबई येथे कामासाठी नियुक्त करण्यात येईल(Recruitment). अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. उमेदवारांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यात येईल. centralbankofIndia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण ६२ रिक्त जागांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच ही मुदत पुढील १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येईल.

उमेदवारांना २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करता येणार आहे. अर्जही विंडो इच्छुक उमेदवारांसाठी खुली करण्यात आली आहे. तर उमेदवारांना जानेवारी २०२५च्या १२ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर उमेदवारांच्या नियुक्तीसाठी जानेवारी २०२५ च्या चौथ्या आठवड्यामध्ये मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे.

सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच EWS आणि OBC या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून सारखीच रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. PWbD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क निशुल्क करता येणार आहे.

डेटा इंजिनिअर/ ऍनेलिस्टच्या पदासाठी ३ जागा रिक्त आहेत. डेटा सायंटिस्टच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. डेटा आर्किटेक्टच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. ML Ops इंजिनिअरच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. जनरल AI एक्सपर्टसच्या रिक्त पदांसाठी २ जागा रिक्त आहेत.

कॅम्पेन मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहेत. SEO स्पेशालिस्टच्या एका रिक्त जागेसाठी उमेदवाराची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच ग्राफिक डिजाइनरच्या एका रिक्त जागेसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. व्हिडीओ एडिटरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे.

कॉन्टेन्ट रायटरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. MarTech स्पेशालिस्टच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. निओ सपोर्ट रिक्रुटमेंटच्या पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. तर निओ सपोर्ट रिक्रुटमेंटच्या L1 पदासाठी १० जागा रिक्त आहेत. प्रोडक्शन सपोर्ट किंवा टेक्निकल सपोर्टच्या १० रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. डिजिटल पेमंट ऍप्लिकेशन सपोर्ट इंजिनिअरच्या पदासाठी १० जागा रिक्त आहेत. डेव्हलोपर किंवा डेटा सपोर्ट इंजिनिअरच्या पदांसाठी १० जागा रिक्त आहेत.

हेही वाचा :

हळदीसाठी ट्रेनने रत्नागिरीला पोहोचली नोरा फतेही; ‘झिंगाट’वर बेधुंद डान्स Video

‘इंडिया’ आघाडीत फूट? ‘या’ कारणामुळे आम आदमी पक्षाने काँग्रेसवरच घेतला आक्षेप

प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहने वयाच्या २५व्या वर्षी संपवलं जीवन…