सातारा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर(political news) यांच्या संदर्भात केलेली वक्तव्यं निंदनीय आहेत .त्यामुळे राष्ट्रपती यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना माघारी बोलवावे अशी मागणी साताऱ्यात आंबेडकरवादी संघटनांनी करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडो संघटना सदस्य सहभागी झाले होते. अमित शहा यांचा निषेध असो, संविधानाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंबेडकरवादी चळवळीचे चंद्रकांत खंडाईत तसेच त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते .शाहू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर(political news) यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली या मोर्चामध्ये सहभागी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आंबेडकर वादी संघटनांचे सदस्य राजपथावरून मोर्चा काढत मोती चौकामध्ये आले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे येथील वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती .मोर्चा मोती चौकातून पुन्हा कर्मवीर पथावरून पोवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला .
जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या वक्तव्याबाबत माफी मागत नाही तोपर्यंत दलित चळवळीचे कार्यकर्ते हे आंदोलन करतच राहणार अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून त्यांना माघारी बोलवावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल त्यांनी केलेले निंदनीय वक्तव्य माफ करण्यासारखे नाही . त्यांनी तातडीने पदत्याग करावा अशी आग्रही मागणी आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत आंबेडकरांवर बोलताना काही विधानं केली होती. त्यावर कॉंग्रेसने अमित शहांनी बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान केल्याचा आरोप करत देशभर आंदोलने केली होती. त्याला आज अमित शहांनी पत्रकार परिषद प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसने संसदेत झालेल्या चर्चेतील विधानं तोडून मोडून जनतेसमोर मांडली आहेत. भाजपा नेत्यांनी विषय फॅक्ट्ससह मांडला, त्यामुळे काँग्रेस अंबेडकर विरोधी, आरक्षण विरोधी आणि संविधान विरोधी पक्ष असल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला आणि आणीबाणी लागू करून संविधानाचा अपनान केला, न्यायालयाचा अपमान केल्याचा घणाघात त्यांनी केला.
अमित शाह म्हणाले, ” काँग्रेसने डॉ. बाबासाहेब अंबेडकरांना निवडणुकीत कसं हरवलं, याची संसदेत चर्चा झाली. काँग्रेसने यासाठी विशेष प्रयत्न केले होते. जिथे भारतरत्न देण्याची गोष्ट येते, तिथे काँग्रेसचे नेते स्वतःला भारतरत्न देत होते, पण बाबासाहेबांना भारतरत्न तेव्हा मिळालं जेव्हा काँग्रेस सत्तते नव्हती. काँग्रेस नेहमीच अंबेडकरांना भारतरत्न मिळू नये यासाठी प्रयत्न करत राहिली.मी त्या पक्षातून येतो जो अंबेडकरांचा कधीच अपमान करू शकत नाही. राज्यसभेत मी जे काही मतं मांडलं, ते काँग्रेसने तोडून मोडून जनतेसमोर मांडलं. काँग्रेसने सत्य चुकीच्या पद्धतीने मांडून जनतेत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेहमीच आरक्षणाचा विरोध करत आली आहे.”
हेही वाचा :
CBI मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात…
प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहने वयाच्या २५व्या वर्षी संपवलं जीवन…
‘इंडिया’ आघाडीत फूट? ‘या’ कारणामुळे आम आदमी पक्षाने काँग्रेसवरच घेतला आक्षेप