घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्ट ब्रोकली बीटरूट सॅलड

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी(breakfast) नेमकं काय बनवावं? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्रोकोली सलॅड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. ब्रोकोली खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये लोह, प्रथिने, जस्त, फायबर, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे आढळून येतात. शिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात(breakfast) तुम्ही ब्रोकोली सॅलड खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही.

नाश्त्यामध्ये बीटरूट खाल्यास शरीरातील कमी झालेली लोहाची कमतरता भरून निघेल. सकाळच्या वेळी तुम्हाला जर हलका नाश्ता हवा असेल तर तुम्ही ब्रोकोली सलॅड बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली सलॅड बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • ब्रोकोली
  • गाजर
  • कांदा
  • बीटरूट
  • मनुके
  • अक्रोड
  • काळीमिरी पावडर
  • मध
  • मीठ
  • लिंबाचा रस
  • दही

कृती:

  • ब्रोकोली बीटरूट सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम, ब्रोकोली आणि बीट स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तुकडे करून दोन्ही भाज्यांना एक वाफ काढून घ्या.
  • मोठ्या बाऊलमध्ये दही टाकून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, किसलेलं गाजर, वाफवून घेतलेल्या भाज्या टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात मनुके, अक्रोड, काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी सलॅडमध्ये लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ब्रोकोली बीटरूट सॅलड.

हेही वाचा :

HSSC मध्ये ‘या’ अंतर्गत मिळणारे 5 गुण होणार बंद

चालत्या रिक्षात धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकले

“ट्रेलर रिलीज करा, नाहीतर…”, राम चरणच्या चाहत्याने ‘गेम चेंजर’ चित्रपटाबद्दल निर्मात्यांना दिली धमकी