फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम

जसं शरीर फीट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा असतो.(Doctors)त्याचप्रमाणे तसंच मेंदू तंदरुस्त ठेवण्यासाठीही मानसिक व्यायाम म्हणजेच ब्रेन एक्सरसाईजेस तितकाच महत्त्वाचा आहे. काही पद्धतीचे व्यायाम तुमची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि एकूणच मेंदूचं कामकाज सुधारण्यास मदत करतात.

CARE रूग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. मुरली कृष्णा यांच्या मतानुसार, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याच्या ‘न्यूरोप्लॅस्टिसिटी’ वर काम करणं गरजेचं आहे. (Doctors)न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे मेंदूच्या नव्या पेशींमध्ये नवं कनेक्शन्स तयार होण्याची क्षमता. वयोमानानुसार, आपल्या शरीरात काही बदल घडतात. त्यामुळे ब्रेन एक्सरसाईज गरजेचे असतात.

का गरजेचा आहे मेंदूचा व्यायाम?
न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजे काय?
मेंदू हा एक असा अवयव आहे जो सतत नवीन शिकत असतो. आपण काही नवं शिकतो, विचार करतो, समस्यांवर उपाय शोधतो त्यावेळी मेंदू नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करतो. यामुळे आपली शिकण्याची क्षमता तसंच स्मरणशक्ती आणि वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची ताकद वाढण्यास मदत होते.

वयासोबत मेंदूचं कार्य हळू होतं
वय वाढत गेलं की मेंदूचं काम कमी होऊ लागतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावेळी स्मरणशक्ती कमी होते, गोष्टी लक्षात राहत नाहीत, विचार करणं मंदावतं. पण जर नियमित मानसिक व्यायाम केला, तर मेंदू एक्टिव्ह राहण्यास मदत होते.

एकाग्रता वाढते
मेंटल वर्कआउट केल्याने मनाला स्थिर ठेवण्याची आणि कामावर लक्ष केंद्रीत करण्याची ताकद वाढण्यास मदत होते.

स्मरणशक्तीला चालना
शरीराच्या स्नायूंप्रमाणेच मेंदूही सरावामुळे अधिक मजबूत होतो. नवीन गोष्टी लक्षात ठेवणं, त्याचा उपयोग करणं, जुनी माहिती आठवणं या सगळ्या बाबतींत सुधारणा होण्यास मदत होते.

मेडिटेशन
ध्यान, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या विचारांवर सजगपणे नजर ठेवणं हे सगळं मेडिटेशनच्या अंतर्गत येतं. (Doctors) यामध्ये तुमच्या मनाला स्थिर ठेवण्याचा सराव होतो. मुळात ध्यान केल्याने मेंदूतील हिपोकॅम्पस आणि प्री-फ्रंटल कॉर्टेक्स या भागांचं कार्य सुधारतं. हे घटक लक्ष आणि आठवणींसाठी महत्त्वाचे असतात.

काय फायदे मिळतात?
ध्यानाने एकाग्रता वाढते
तणाव कमी होतो
स्मरणशक्ती सुधारते.

मेमरी गेम्स
स्मरणशक्ती आणि लॉजिकल विचार यांच्यासंबंधीचे खेळ, कोडी किंवा पझल्स सोडवणं यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये नवे कनेक्शन तयार होतात.

काय फायदे मिळतात?
अल्पकालीन स्मरणशक्ती सुधारतेविचारांची लवचिकता वाढतंमेंदू सतत अ‍ॅक्टिव्ह राहतो

नवीन काही शिकल्यावर मेंदूला नवीन माहिती साठवावी लागते. यासाठी मेंदूला एक प्रक्रिया करावी लागते. यामुळे नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतात.
काय फायदे मिळतात?नवीन गोष्टी शिकताना मेंदूचा वेग वाढतो
लक्ष केंद्रित करण्याची ताकद वाढते

हेही वाचा :

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर

धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

‘…तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड’; दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं