आज 4 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी(astrology) आहे. पंचमी तिथी रात्री10 वाजून 2 मिनिटांपर्यंत राहील. सकाळी 10 वाजून 8 मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. याशिवाय आज दुपारी 12:02 वाजता बुध धनु राशीत प्रवेश करेल. तर राहू काळ सकाळी 9 वाजता सुरू होऊन 10:30 वाजता संपेल. आज शनिवारी तुमच्या राशीत काय लिहिले आहे, ते पाहुयात
दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे(astrology) तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
तूळ:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. आज जवळचा प्रवास योग आहे. वाहने सावकाश चालवा.
वृश्चिक:- सामाजिक स्तरावर तुमचे कौतुक होईल. सुट्ट्या घेऊन काही दिवस फिरायला जाल. मित्रांसोबत मौज मज्जा कराल. प्रवासात तुम्हाला तुमचा जोडीदार देखील भेटू शकतो.
धनू:- मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. आज तुम्हाला धनलाभ देखील होण्याची संभावना आहे.आज तुमच्यावर शनिदेव प्रसन्न राहतील.
मकर:- आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. आर्थिक अडचणी दूर होतील. नवीन घर घेण्याचा विचार कराल. तुम्हाला सरकारी योजनेचे आज पैसे मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.
कुंभ:- खूप दिवसांपूर्वी केलेल्या एखाद्या कामातून लाभ संभवतो. आज तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असेल. तुमच्या आरोग्याच्या समस्या सुटतील. आजचा दिवस समाधानी जाईल.
हेही वाचा :
लघुशंकेच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, नेमकं काय काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारत सरकारला आवाहन
लाडक्या बहिणीवर पहिली कारवाई! ५ महिन्यांचे पैसे सरकारजमा… महायुतीने वाढवलं टेन्शन!