नवीन वर्षात SBI ची भन्नाट योजना, देशातील प्रत्येक घर होणार करोडपती

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नवीन वर्षात दोन नवीन योजना(yojana) सुरु केल्या आहेत. यामधील एक योजना प्रत्येक घराला करोडपती बनवण्याची आणली आहे. ‘हर घर लखपती’ आणि ‘एसबीआय पॅट्रन्स’ अशी या दोन नवीन डिपॉझिट स्कीमची नावे आहेत. या योजना ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. ही एफडी योजना आहे.

SBI ने दिलेल्या माहितीनुसार,’हर घर लखपती’ ही एक प्री-कॅलक्युलेटिड रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे. जी ग्राहकांना 1 लाख रुपये किंवा त्याच्या पटीत बचत करण्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. नवीन स्कीम तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात, जेणेकरून ग्राहक अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करून बचत करू शकतील. एसबीआयची ही स्कीम अल्पवयीन मुलांसाठीही उपलब्ध आहे, जी लहान मुलांमध्ये लवकर आर्थिक नियोजन आणि बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एसबीआय पॅट्रन्स’ विशेष एफडी स्कीम सुरू केली आहे. ही स्कीम 80 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ‘एसबीआय पॅट्रन्स’ या नवीन स्कीमअंतर्गत, सामान्यपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. तसेच, ही स्कीम जुन्या आणि नवीन दोन्ही एफडी गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे. नवीन स्कीममधून हे स्पष्ट झाले आहे की, बँक नवीन गोष्टी करण्यावर खूप जोर देत आहे. पैसे जमा करण्याच्या बाबतीत बँक आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सीएस सेट्टी म्हणाले की, त्यांचे उद्दिष्ट लक्ष्याभिमुख ठेव उत्पादने तयार करणे आहे. जे केवळ आर्थिक परतावा वाढवत नाहीत तर आमच्या ग्राहकांच्या आकांक्षेशी सुसंगत आहेत. आम्ही पारंपारिक बँकिंग अधिक सर्वसमावेशक आणि प्रभावी बनवण्यासाठी पुन्हा परिभाषित करत आहोत. SBI मध्ये, आम्ही प्रत्येक ग्राहकाला सक्षम करणारे उपाय प्रदान करण्यासाठी नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी वचनबद्ध आहोत असे ते म्हणाले.

एसबीआय व्ही-केअर ठेव योजना(yojana) ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.50 टक्के व्याज दर देते. त्याचप्रमाणे SBI 444 दिवसांची FD योजना (अमृत दृष्टी) ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर देते. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे. SBI अमृत कलश, 400 दिवसांची FD योजना ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याजदर देते. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे.

कोणीही किमान 12 महिने आणि जास्तीत जास्त 120 महिन्यांच्या कालावधीसाठी SBI RD खाते उघडू शकतो. एसबीआयमध्ये आरडी खाते दरमहा किमान 100 रुपये ठेवीसह उघडता येते. आरडी खात्यांमध्ये उशीरा पेमेंट केल्यास दंड आकारला जातो. सलग सहा हप्ते चुकल्यास, आरडी खाते मुदतीपूर्वी बंद केले जाईल आणि खातेधारकाला शिल्लक रक्कम दिली जाईल.

हेही वाचा :

‘अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात…’; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं

पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध हाके; धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरु न देण्याची धमकी!

धक्कादायक! ‘चौकशी करणारेच PSI वाल्मिक कराडचे मित्र? जितेंद्र आव्हाडांनी थेट फोटो केले पोस्ट