मनोज जरांगे कोणाच्या फोननंतर पुण्यातील मोर्चा सोडून माघारी, समोर आलं कारण

मस्साजोग गावातील सरपंच संतोष(Front) देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात मोठा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये विविध मान्यवर सहभागी झाले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना अचानक मोर्चा सोडावा लागला होता. नेमकं काय झालं होतं याची माहिती समोर आली आहे.

आदित्य भवार, पुणे : मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे काढले जात आहेत. आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी घेऊन काल पुण्यात एक विशाल मोर्चा निघाला होता. मात्र, या मोर्च्यात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना अचानक माघारी फिरावे लागले. लाल महाल येथून या मोर्चाची सुरुवात झाली, परंतु काही वेळातच जरांगे पाटील मोर्चातून बाहेर पडले.

पुण्यातील या मोर्चामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा (Frontआंदोलक मनोज जारांगे पाटील, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना अचानक मोर्चा सोडावा लागला, आणि त्यामागचं कारण आता समोर आलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी “जन आक्रोश मोर्चा”त सहभाग घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. परंतु, त्यानंतर जरांगे पाटील आंदोलकांना भेटून तात्काळ निघून गेले. कारण त्यांच्या चुलत भावाचं अपघाती निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. चुलत भावाच्या अंत्यविधीसाठी जरांगे पाटील यांना पुण्यातून तात्काळ निघावं लागलं, त्यामुळे त्यांचा मोर्चामधील सहभाग अपूर्ण राहिला.

जरांगेंवर गुन्हा दाखल
परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. बदनामीकारक वक्तव्य व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्याविरुद्ध असंज्ञेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

झोपलेल्या वाघावर भुंकणे श्वानाला पडले महागात, पुढे जे घडले… थरारक Video Viral

ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक

लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट