नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात(politics)अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मतदारावर संताप व्यक्त केला होता. यावर बोलताना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सल्ला दिला. ‘मतदार हेच देशाचे मालक, अजितदादांनी असे हे बोलू नये’, असे त्यांनी सांगितले.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2025/01/image-100-1024x1024.png)
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यावर विचारले असता ते म्हणाले, ‘पक्षाने माझे किती लाड केले हे मी आणि पक्ष बघून घेईन. धनंजय मुंडेंचा राजीनामा कशाला हवा? चौकशीत काय समोर आलं आलंय का? मी या अशा परिस्थितीतून गेलो आहे. मंत्रिपद काही सहज मिळत नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची(politics) मागणी योग्य नाही. देशात लोकशाही आहे, ठोकशाही नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मतदार हेच देशाचे मालक आहेत. अजितदादांनी असे हे बोलू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच चीनमधून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालायला हवी. महाकुंभ मेळावर एचएमपीव्ही व्हायरसचं सावट आहे.
जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19 महामारीनंतर चीनमध्ये HMPV नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच आता भारतातही HMPV विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण समोर आला आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलामध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे. एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसची पहिली केस बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. बेंगलुरूमध्ये 8 महिन्याच्या मुलामध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (एचएमपीवी) ची पुष्टी झाली आहे.
हेही वाचा :
अर्थसंकल्पात नोकरी करणाऱ्या लोकांना मिळणार मोठा दिलासा?
“ए. आर. रहमानचा इस्लाम स्वीकार: हिंदू ज्योतिषाचा प्रभाव आणि मुस्लिम नावाची ठेवलं”
‘…म्हणून वेळीच खबरदारी घ्या’, शरद पवारांचाCM फडणवीसांना सल्ला!